CBI arrests two senior officials of Reliance Communications in a major bank loan fraud case following SBI’s complaint.  saam tv
देश विदेश

रिलायन्स कम्युनिकेशन्स कर्ज घोटाळा प्रकरण; २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक, CBIची मोठी कारवाई

CBI Action On Reliance Communications : स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज घोटाळा प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Bharat Jadhav

  • रिलायन्स कम्युनिकेशन्स कर्ज घोटाळ्यात सीबीआयची मोठी कारवाई

  • दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक

  • एसबीआयच्या तक्रारीनंतर तपासाला गती

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित कथित बँक कर्ज घोटाळा प्रकरणात सीबीआयने कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी डी. विश्वनाथ आणि अनिल कल्या यांना अटक करण्यात आली आहे.

दोघांवरही बँक कर्जातील हजारो कोटी रुपयांचा अपहार आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

एसबीआयला २,९२९ कोटी रुपयांचे नुकसान

रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी केलेल्या कथित फसवणुकीमुळे एकट्या एसबीआयला अंदाजे २,९२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, १७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना एकूण १९,६९४ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. तपासात असे उघड झाले की, कंपनीने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार केले आणि खोट्या सेवा व्यवहारांचा वापर करून निधीचा अपहार केला.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, डी. विश्वनाथ कंपनीचे बँकिंग कामकाज सांभाळत होते, तर अनिल काल्याने यात सक्रिय भूमिका बजावली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. तपास सुरू आहे. हे लक्षात घ्यावे की, सीबीआयने यापूर्वी अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित अनेक गुन्हे दाखल केले आहेत. आणखी एका दुसऱ्या प्रकरणात, दिल्ली न्यायालयाने गुरुवारी रिलायन्स अनिल अंबानी समूहाचे माजी वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला आणि अमित बापना यांना कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात पाच दिवसांसाठी ईडीच्या कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

Accident: नाशिकमध्ये अपघाताचा थरार! एसटी बसने बापलेकाला चिरडलं, मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

ठाकरेंना हवा भाजपमुक्त राम, राम मंदिरातील चोरीविरोधात ठाकरेसेनेचं आंदोलन

Ketan Agarwal Case: 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं', सियाची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT