Hardeep Nijjar saam Tv
देश विदेश

Terrorist Hardeep Nijjar: खलिस्तानी हरदीप निज्जरचे मारेकऱ्यांना लवकरच अटक होईल: रिपोर्ट

Terrorist Hardeep Nijjar: हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी भारत सरकारवर आरोप केले होते. १८ जून रोजी कॅनडामधील गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी समर्थक निज्जरची हत्या झाली होती.

Bharat Jadhav

Khalistani Terrorist Hardeep Nijjar :

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलीस आरोपींचे धागेदारे लागले आहेत. हत्येत सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. द ग्लोब अॅण्ड मेल वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांची आरोपींवर नजर असून त्या दोघांना लवकर अटक केली जाण्याची शक्यता आहे. (Latest News)

द ग्लोब अॅण्ड मेल वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांची आरोपींवर नजर असून त्या दोघांना लवकर अटक केली जाण्याची शक्यता आहे.अज्ञात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जरच्या हत्येनंतरही हे दोन्ही संशयित मारेकरी कॅनडामध्येच (Canada) आहेत. सरे शहरातील गुरुद्वाराबाहेर १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी (terrorist) निज्जरची हत्या झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान (Prime Minister) जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी आरोप केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले होते. दरम्यान भारताने २०२० निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. भारताने ट्रुडोच्या आरोपांना तथ्यहीन म्हटलं होतं. परंतु कॅनडाने आरोप केल्यानंतर अहवालनंतर म्हटलं होतं की,आरोप दाखल झाल्यानंतर,पोलीस मारेकऱ्यांचा कथित सहभाग आणि भारत सरकारशी (Government of India) त्यांचे संबंध याबद्दल तपशील उघड करतील, असं कॅनडाने म्हटलं होतं.

भारताने कॅनडासोबतच्या संबंधांबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. गेल्या आठवड्यातच भारताने म्हटलं की, कॅनडाबाबतचा आपला मुख्य मुद्दा त्या देशात सक्रीय राष्ट्रविरोधी घटकांना राहू देण्याची परवानगीचा आहे. भारतविरोधी घटकांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली होती. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताला आशा आहे की कॅनडा फुटीरतावादी आणि भारतविरोधी घटकांवर कारवाई करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT