विदेशी नागरिकांना भारतात लस घेता येणार? केंद्राचा मोठा निर्णय  Saam Tv
देश विदेश

विदेशी नागरिकांना भारतात लस घेता येणार? केंद्राचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून 2nd Wave भारत देश सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत आहे तरी डेल्टा व्हेरिअंटचे Delta Variant रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था Health Department सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचे लसीकरण Vaccination करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास ५१ कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. आता परदेशी नागरिकांनाही भारतात कोरोना लस मिळू शकेल. केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली आहे.

ओळखपत्रासाठी अशी असेल अट;

आता परदेशी नागरिकांनाही भारतात कोरोना लस मिळू शकेल. केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोव्हिन लस मिळवण्यासाठी CoWin APP वर नोंदणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने असे सांगितले होते की भारतात राहणारे परदेशी नागरिक CoWin वर नोंदणी करताना ओळखपत्रासाठी त्यांचा पासपोर्ट क्रमांक वापरू शकतात. पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर त्यांना लसीकरणासाठी स्लॉट मिळेल.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, मोठ्या संख्येने परदेशी नागरिक देशात राहत आहेत. यातील बहुतेक लोक केवळ महानगरांमध्ये राहतात. या भागात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे.

आतापर्यंत देशातील कोविड -19 लसीचे 51 कोटीहून अधिक डोस लोकांना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. भारताला 10 कोटींचे लक्ष्य साध्य करण्यासाठी 85 दिवस लागले. यानंतर, 20 दिवसांचे लक्ष्य 45 दिवसांत साध्य झाले आणि 30 कोटींचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणखी 29 दिवस लागले. यानंतर, देशात 24 दिवसात 40 करोड लसीचे डोस देण्यात आले आणि त्यानंतर 20 दिवसांनी 6 ऑगस्ट रोजी हा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला. त्यानंतर तीन दिवसांच्या आत देशात एक कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT