crime update  saam tv
देश विदेश

Crime: मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये ५४६ मुलींचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ, फोटो

Cafe Owner Mastermind Behind Strumpet racket: सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २३ आरोपी अटकेत.

Bhagyashree Kamble

एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत २३ जणांना ताब्यात घेतलं आहे. २३ पैकी १२ आरोपींच्या मोबाईलमध्ये ५४६ मुलींचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ तसेच फोटोही आढळले आहेत. या व्हिडिओचे लोकेशन उत्तर प्रदेशसह ५ राज्यात आढळून आले आहे. ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. या प्रकरणाच्या सुत्रधाराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सामूहिक बलात्काराचा सुत्रधार पोलिसांच्या तावडीत

सामूहिक बलात्कार या प्रकरणाचा सुत्रधार अनमोल गुप्ता हा कांटिनेल कॅफेचा मालक आहे. या घटनेच्या तपासावरून मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो अन् व्हिडिओ आढळले आहेत. हे व्हिडिओ कॅफेमध्ये शूट करण्यात आले असून, हे व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.

आरोपीची चौकशी केली असता, तो जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक तयार करण्यासाठी कॅफे चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. हा सेक्स रॅकेट चालवण्यासाठी अनमोलच्या वडिलांनीही त्याला सपोर्ट केल्याची माहिती आहे. तसेच हे सर्व आरोपी कॅफेशी संबंधित असून, बाराही आरोपी हे ड्रग्ज व्यसनी आहेत.

पोलिसांना असेही आढळून आले की, मास्टरमाईंड अनमोलने कॉन्टिनेंटल कॅफेद्वारे १५ मुलांना एजंट म्हणून नियुक्ती केली होती. हे एजंट मुलींसोबत आधी मैत्री करायचे. नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून ब्लॅकमेल करायचे. तसेच त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT