Accident News  Saam Tv
देश विदेश

Accident News : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वऱ्हाड्यांनी भरलेली बस दरीत कोसळली

या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

वृत्तसंस्था

Accident News: उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी वऱ्हाड्यांनी भरलेली बस 500 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये सुमारे 45 ते 50 जण प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळावरी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्य सुरु आहे.

तसेच स्थानिक नागरिकही यंत्रणेला बचावकार्यात मदत करत आहेत. एसडीआरएफच्या (NDRF) चार पथके येथे बचावकार्यात गुंतलेली आहेत. या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तर आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात एसडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तर, उर्वरीत लोकांचा शोध सुरु आहे.

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली. "पौरी गढवालच्या बिरखल भागात काल रात्री झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि एसडीआरएफने 21 जणांची सुटका केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Cough Syrup: कफ सिरपनं घेतला आणखी एकाचा जीव; दोन चमचे औषध प्यायल्यानंतर महिलेनं सोडला जीव, रुग्णालयातच घडला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT