Deadly highway accident between Damascus and Deir ez-Zor saam tv
देश विदेश

महामार्गावर भीषण अपघात! दोन बस समोरासमोर धडकल्या; ३५ जणांचा मृत्यू

Bus Accident: सीरियाची राजधानी आणि पूर्वेकडील 'देर एझ-झोर' (Deir ez-Zor) प्रांत यांना जोडणाऱ्या महामार्गावर दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन किमान ३५ जण ठार झाले, तर डझनभर लोक जखमी झालेत.

Bharat Jadhav

  • दमास्कस-देर एझ-झोर महामार्गावर दोन बसची भीषण धडक झाली.

  • या अपघातात किमान ३५ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी

  • बचावकार्यात सीरियन लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी सहभाग घेतला.

सीरियाची राजधानी आणि पूर्वेकडील 'देर एझ-झोर' प्रांताला जोडणाऱ्या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत. 'साना' (SANA) या वृत्तसंस्थेने आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले की, वाळवंटातील महामार्गावर प्रवासी बस आणि गृह मंत्रालयाची बस यांच्यात झालेल्या धडकेत सुमारे ३० लोक जखमी झालेत. वृत्तानुसार घटनास्थळी सुरू असलेल्या मोहिमेत सीरियन लष्कराची हेलिकॉप्टर्सही सहभागी होती.

गृह मंत्रालयाने दिली माहिती

देशातील सरकारी वृत्तसंस्था 'साना'चा (सीरियन अरब न्यूज एजन्सी) हवाला देत या वृत्तात म्हटले आहे की, अपघातस्थळी हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत, जेणेकरून जखमींना बाहेर काढून त्यांना होम्स लष्करी रुग्णालयात हलवता येईल. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित आव्हाने आहेत, पण ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तिथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

एका बसमधून सुरक्षा कर्मचारी प्रवास करत होते, तर दुसरी बस नागरिकांना घेऊन जात होती. आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद मंत्री राएद अल-सालेह यांनी सांगितले की, या वर्षीच्या जानेवारीपासून देशात सुमारे २,००० अपघात झाले आहेत.

खराब रस्त्यांमुळे अपघात

अहवालांनुसार राज्यातील रस्त्यांची खराब स्थिती आहे. खड्डेमय रस्ते झाले आहेत आणि अतिरेक्यांच्या अधूनमधून होणाऱ्या कारवायांमुळे पाल्मिरा आणि अल-सुखना यांच्या दरम्यानच्या मार्गाची स्थिती खूप खराब झाली आहे. अनेक वर्षांपासून येथे रहदारीसाठी व्यत्यय येत आहे. मध्य सीरियाचा मोठा भाग आता सरकारच्या नियंत्रणाखाली असला, तरी या भागात अस्थिरता कायम आहे.

गेल्या दशकापासून सुरू असलेल्या यादवीमुळे देशातील वाहतूक पायाभूत सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. प्रमुख शहरांना जोडणारे महामार्ग अनेक वर्षांची उपेक्षा, हवाई हल्ले आणि देखभालीचा अभाव यामुळे रस्त्यांना खाचखळगी पडली आहेत. परिणामी, प्रत्यक्ष संघर्ष सुरू नसतानाही तिथे प्रवास करणे धोकादायक बनलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT