Union Budget 2022 Saam Tv
देश विदेश

Budget 2022 Live Updates: जानेवारीमध्ये GST वसुली वाढली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोनाचे (Corona) संकट २ वर्षांपासून ओढावले आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेसमोर (Economy) यातून सावरण्याचे आव्हान आहे. (Budget 2022 GST collection increased in January)

हे देखील पहा-

अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याकरिता या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्राला दिलासा देणे आणि रोजगार निर्मितीचे आव्हान केंद्र सरकारपुढे राहणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थ मंत्रालयात पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीनंतर त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे.

यामध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प घेऊन अर्थमंत्री निर्मला सितारामन या संसदेत पोहोचणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पा अगोदर जीएसटी (GST) कलेक्शनविषयी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात १.३८ लाख कोटी रुपयांचा जीएसटी सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्के अधिक आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी कलेक्शन १.३० लाख कोटींहून अधिक असून सर्वाधिक जीएसटी कलेक्शन मागीलवर्षी एप्रिलमध्ये १.३९ लाख कोटी रुपये इतके झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Apple Maps Privacy: यूजर्ससाठी प्रायव्हसी धोका! Apple Maps तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे, 'ही' सेटिंग लगेच बंद करा

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

SCROLL FOR NEXT