Brothel Racket Busted Saam TV News
देश विदेश

एका रात्रीसाठी ६ हजार अन्...; गेस्ट हाऊसमध्ये भलताच कांड, पण 'त्या' ऑडिओ क्लिपमुळं बिंगच फुटलं

Brothel Racket Busted: झोया नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून ३ महिलांची सुटका केली आहे. रॅकेट गेल्या ८ महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

  • गुवाहाटीच्या झोया नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे.

  • पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून ३ महिलांची सुटका केली आहे.

  • रॅकेट गेल्या ८ महिन्यांपासून सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टर जप्त करण्यात आलं आहे.

  • हॉटेलच्या इतर रूममध्येही वेश्याव्यवसाय चालत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आसाममधील गुवाहाटीमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुवाहाटी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी एका रात्रीसाठी ६००० रूपये आकारले जात होते. पोलिसांना या रॅकेटबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाड टाकत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी शहरातील जोया नगर परिसरात मंगळवारी पोलिसांनी धाड टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. डीसीपी मृणाल डेका यांनी सांगितले की, 'दिसपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनुसार जोया नगरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघड झालं', अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी तपास करीत ४ जणांना ताब्यात घेतलं. तसेच हॉटेल मालकालाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, हा बेकायदेशीर व्यवसाय गेल्या ८ महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेस्ट हाऊस व्यतिरिक्त इतर हॉटेल्सच्या रूममध्येही देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता.

या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी केली असून, पोलिसांनी गेस्ट हाऊसचं रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. इतकंच नाही तर, या प्रकरणाबाबत एका महिला आणि पुरूषाची ऑडिओ क्लिपही पोलिसांना सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या तिन्ही महिलांचं वय २० ते २८ आहे. ते गुवाहाटीतील रहिवासी आहेत. या कामासाठी महिलांना दरमहा १८ हजार रूपये मिळतात, अशी माहितीही समोर आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही लोकांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. लवकरच पोलीस त्यांना ताब्यात घेतील, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT