Covid19: दोन डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी ब्रिटनने केली मोठी घोषणा Saam Tv
देश विदेश

Covid19: दोन डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी ब्रिटनने केली मोठी घोषणा

कोरोना महामारी मधून वाचण्याकरिता लसीकरण मोहिम राबवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कोरोना महामारी मधून वाचण्याकरिता लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र, काही लसींमुळे बाहेर देशात जाण्यास मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहेत. गेल्या काही दिवसांअगोदर भारतीय कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटनने मान्यता देण्यास नकार दिला होता. यामुळे भारतीय सरकारकडून प्रचंड संताप व्यक्त केले जात होते. यातच आता कोव्हिशिल्ड लशींचा डोस घेतलेल्यांसाठी ब्रिटनने मोठी घोषणा केली आहे.

हे देखील पहा-

भारताकडून संताप व्यक्त झाल्यावर देशाच्या दबावामुळे ब्रिटनने शेवटी कोव्हिशिल्डच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. यातच आता ब्रिटनने मान्यता दिलेल्या लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार नसल्याचे देखील घोषणा करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोव्हिशिल्डच्या लसीवर ब्रिटनला शंका असल्याने त्यांनी या लसीला मान्यता दिली नव्हती. प्रत्येक देशाने आपल्या देशाकरिता काही ठराविक लसींना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ब्रिटननंही आपल्या देशाकरिता काही लसींची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत कोव्हिशिल्डचे नाव वगळले होते. ब्रिटनमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश जरी मिळणार असला, तरी त्यांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते.

मात्र, आता ११ ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये ब्रिटननं बदल केलेला आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनकडे कोव्हिशिल्ड लसीला मान्यता नसल्याचा मुद्दा उपस्थित केलेला होता. परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की, कोविडशील्ड लसीला परवानगी न करणे हे भेदभाव करणारे धोरण आहे. यानंतर ब्रिटननं ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT