Kashmir News : काश्मीर खोऱ्यातली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीनं एक-दोन नव्हे तर, २७ तरुणांशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्याकडील सोने आणि पैसे लुटून ती फरार व्हायची.
बडगाम जिल्ह्यातली ही घटना आहे. तरुणीने २७ तरुणांशी लग्न केल्याची माहिती श्रीनगरच्या लालचौक येथील प्रेस कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या तरुणीनं २७ जणांकडील सोने आणि पैसे लुटून पोबारा केला आहे. लग्नानंतर ती काही जणांकडे अनेक दिवस राहिली. त्यांच्याकडील सोने आणि पैसे घेतले. त्यानंतर माहेरी जाते म्हणून निघून गेली. त्यानंतर ती कधीच परतली नाही.
श्रीनगरच्या लालचौकमधील प्रेस कॉलनीतील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही तरुणी राजौरीत राहते. त्यांची एक टोळी आहे. त्यात काही लग्न जुळवणाऱ्या व्यक्ती देखील आहेत. श्रीमंत व्यक्ती बघून त्यांना जाळ्यात ओढायचे. (Crime News)
बडगाम जिल्ह्यातील एक तरूणही या तरुणीच्या जाळ्यात अडकला होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी त्याच्याकडे एक लग्न जुळवणारी व्यक्ती आली होती. तो बऱ्याचदा आला होता. त्याने राजौरी येथील तरुणीचा फोटो दाखवला. तिच्याशी लग्न करावं म्हणून कैक दिवसापासून मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचा डाव ओळखता आला नाही आणि त्यात मी अडकलो.
अन्य एका व्यक्तीने सांगितले की, संबंधित व्यक्तीने त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले. मुलाचे लग्न एका तरुणीशी लावून देण्याच्या भूलथापा दिल्या. पैसे परत मागितले असता, त्या तरुणीचा अपघात झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने राजौरीच्या तरुणीचे फोटो दाखवले. मुलगा तिच्यासोबत लग्न करण्यास तयारही झाला. लग्नानंतर काही दिवसांत तरुणीने डॉक्टरकडे जाते सांगितले. मुलालाही सोबत नेले. मात्र, मुलगा रुग्णालयातील काउंटरवर चौकशीसाठी गेला असता, ती तरुणी पसार झाली.
संबंधित तरुणी आणि तिच्या साथीदारांनी दिलेले सर्व पत्ते आणि त्याच्याबद्दलची माहिती चुकीची आहे. कागदपत्रे आणि ओळखपत्रेही बनावट होती. या प्रकरणी अनेक पीडित कुटुंबीयांनी बडगाम पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदारांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.