Bride Saam Tv
देश विदेश

लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहितेनं 'असं' काही केलं...; पतीसह सासरची मंडळी हादरली!

काही वर्षांपूर्वी पडद्यावर आलेला 'डॉली की डोली' हा बॉलीवूड चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. ज्यामध्ये अभिनेत्री नवरी बनून नवरदेवांना फसवते. डॉलीने अनेकांशी लग्न केले आणि नंतर घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. ही रील लाईफची कथा होती. पण ही खऱ्या आयुष्याची गोष्ट आहे.

वृत्तसंस्था

बिहार: घरात कोणीही नसताना लग्नाच्या पहिल्या दिवशी एका नववधूने सासरच्या घरातून लाखोंचे दागिने आणि 30 हजारांची रोकड घेऊन पळ काढला आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणातून असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या फरार नवरीचा सीडीआर तपासण्यात येत आहे. (Bihar Crime New)

काही वर्षांपूर्वी पडद्यावर आलेला 'डॉली की डोली' हा बॉलीवूड चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. ज्यामध्ये अभिनेत्री नवरी बनून नवरदेवांना फसवते. यामध्ये अभिनेता राजकुमार रावसह इतर कलाकारांनी अभिनय केलेला आहे. डॉलीने अनेकांशी लग्न केले आणि नंतर घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. ही रील लाईफची कथा होती. पण ही खऱ्या आयुष्याची गोष्ट आहे, जी अलीकडेच बिहारच्या (Bihar) कैमूरमध्ये घडली आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशी वराला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आमिष दाखवून एक वधू गायब झाली आहे.

हे प्रकरण जिल्ह्यातील भाबुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी लग्नाच्या तीन दिवसांतच फसवणूक झालेल्या नववधूने लाखो रुपयांचे दागिने आणि 30 हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, भाबुआ पोलीस स्टेशन हद्दीतील शिवोन गावातील रहिवासी मनोहर प्रजापती यांचा मुलगा अमित कुमार याचा विवाह बक्सरा येथील अवधेश प्रजापती यांची मुलगी प्रीती प्रजापती हिच्याशी झाला होता. तरुणीचे हे गाव रोहतास जिल्ह्यातील करहागर पोलीस स्टेशनच्या पोस्ट बिसोदिहारी येथे आहे. 9 मे रोजी हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वर आपल्या वधूसह घरी आला. घरात आनंदाचे वातावरण होते. नवीन सून आल्याने सर्वजण खूप आनंदात होते. पण सुनेच्या मनात वेगळंच काही चाललंय हे त्यांना माहीत नव्हतं. मधुचंद्राच्या दिवशी सुनेने संधीचा फायदा घेतला. घरातील लोक काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांनी घरात ठेवलेले दागिने व 30 हजारांची रोकड उचलून नेली. त्यानंतर ती तिथून पळून गेली.

हे देखील पाहा-

प्रेमप्रकरणाशी संबंधित...;

घरातील सदस्य परत आल्यावर त्यांनी वधूचा शोध सुरू केला. ती कुठेच सापडली नाही आणि घरात ठेवलेले लाखोंचे दागिने व पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना हा सगळा प्रकार समजला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला आहे. कुठेतरी हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले. सध्या पोलीस वधूचे कॉल डिटेल्स शोधात आहेत. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT