Deoria Wedding Cancel Saam Tv
देश विदेश

Deoria Wedding Cancel: लग्नविधी चालू असताना नवरीला आला फोन; नंतर नवरदेवाला आलं टेन्शन

Deoria Wedding Cancel: एक फोन कॉल आल्यामुळे एक व्यक्तीचं लग्न मोडलंय. लग्नाची विधी होत असताना नवरी मुलीला एका मुलीचा फोन आला, त्यानंतर वधूने लग्नास नकार दिलाय.

Bharat Jadhav

एक फोन कॉल तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ करू शकते. याची प्रचिती उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला आलीय. लग्नविधी चालू असताना नवरी मुलीच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यानंतर नवरीनं लग्न मोडलं. ही घटना घडलीय उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे. त्याचं झालं असं, देवरिया येथे एक लग्न समारंभ चालू होता, त्याचवेळी नवरी मुलीला फोन आला. त्यानंतर हा फोन ऐकल्यानंतर नवरीने थेट लग्न मोडलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरी मुलीला नवरदेवाच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती मैत्रिण त्याची प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे. आता होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेयसी म्हटल्यावर नवरी मुलीच्या डोक्याचा पारा चढला. तिने काही वेळ फोनवर त्या मुलीशी चर्चा केली नंतर आयुष्यातील मोठा निर्मण घेतला. नवरदेवाच्या प्रेयसीचा फोन आल्याची माहिती वधूने तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य पाहून नवरदेवाच्या पक्षातील लोकांनाही पोलीस ठाण्यात बोलावले. तेथे दोन्ही वधू आणि वर या दोन्ही बाजूकडील लोकांसह चर्चा केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचे लग्न रद्द करण्याचं ठरवलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सलेमपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

येथे राहणाऱ्या एका व्यक्ती आपल्या मुलीचे लग्न भाटपार राणी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत ठरवले होते. रविवारी नवरदेवाचं वऱ्हाड येणार होतं. ठरलेल्या कार्यक्रमानुसार दोन्ही बाजुकडील कुटुंबियांच्या घरी तयारी सुरू होती. दोन्ही घरात नातेवाईकांच्या गर्दी होती. सर्वजण आनंदात होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी वधूच्या घरी सर्वजण मटकोड विधीची तयारी करत होते त्याचवेळी नवरदेवाच्या मैत्रिणीने वधूला कॉल केला.

तिने वधूला तिच्या भावी वराशी असलेल्या त्याच्या अफेअरबद्दल सांगितले. होणाऱ्या नवऱ्याची हकीकत ऐकून वधू थक्क झाली. हा प्रकार त्यांनी घरच्यांना सांगितला. वधूपक्षातील लोकांनी घाईघाईने सलेमपूर कोतवाली गाठली. त्यांनी तेथील पोलिसांना टीजे सिंग यांना संपूर्ण समस्या सांगितली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्यांनी वराच्या बाजूनेही पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र मुलीच्या घरच्यांना लग्न मान्य नव्हते. पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती दोन्ही पक्षांनी परस्पर विवाह न करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात फौजदार टीजे सिंह यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र काही निष्पन्न होऊ शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT