UP News
UP News  Saam Tv
देश विदेश

UP News : भयानक! डीजेच्या डान्सवरून लग्नमंडपातच वऱ्हाडी मंडळी एकमेकांशी भिडले; एकाचा मृत्यू

Shivani Tichkule

Latest UP News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे बुधवारी रात्री एका लग्न समारंभात डीजेवर डान्स करण्यावरून वऱ्हाडी मंडळी जोरदार भांडण झालं. यादरम्यान बचावासाठी आलेल्या मुलीच्या बाजूच्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

खानापूर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतून नवरदेवाची मिरवणूक आली होती आणि वधू पक्षाचे लोक शहर परिसरातूनच होते. लग्नात सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत होते. रात्री अकराच्या सुमारास दोन्ही बाजूचे लोक डीजेवर नाचत होते. यादरम्यान डीजेच्या डान्सवरून नवरी-नवरदेवाच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारी पाहून तेथे उपस्थित मुलीच्या बाजूचे लोक मदतीला आले.

बुलंदशहरच्या ज्ञान लोक कॉलनीत राहणारा ४० वर्षीय अजय यांनी मध्यस्थी करण्यासाठी डान्स फ्लोअरवर पोहोचले तेव्हा त्यांना देखील मारहाण करण्यात आली, त्यामुळे ते बेशुद्ध झाले आणि खाली पडले. त्यानंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. अजयला रुग्णालयात (Hospital) नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृताच्या मुलाने कोतवालीनगरला दिली.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बुलंदशहरच्या एएसपी अनुकृती शर्मा यांनी दावा केला की, मृताच्या शरीरावर जखमेचं कोणतंही निशाण नाही. अंतर्गत जखमांमुळे अजयचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पाकिस्तानचा घर जाळून कोळशाचा व्यापार! सरकारी कंपन्या विकणार?

Special Report | दादा-ताई असा फरक कधीच केला नाही! पवार स्पष्टच बोलले..

Akola News: अकोल्यात एकाच दिवसात 3 मोठे अपघात, 5 जणांचा मृत्यू

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

SCROLL FOR NEXT