Prime Minister Narendra Modi  saam tv
देश विदेश

Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार, मोठी घोषणा होण्याची शक्यता

Prime Minister Narendra Modi Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. जीएसटी कपात, अमेरिका टॅरिफ वॉर, H1B व्हिसाचे नवे नियम, भारत-पाकिस्तान संबंध आणि पूरग्रस्त उत्तर भारतासाठी मदत अशा विषयांवर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

  • जीएसटी कपात, अमेरिका टॅरिफ वॉर, H1B व्हिसा नियम या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे.

  • पूरग्रस्त उत्तर भारतासाठी मदतीची घोषणा होण्याचीही शक्यता.

  • बिहार निवडणुकीसाठी घोषणेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Breaking News : Prime Minister Narendra Modi will address the nation today at 5 pm : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. जीएसटी कपात, अमेरिका टॅरिफ वॉर, H1B व्हिसासाठी अमेरिकेचे नवे नियम, भारत-पाकिस्तान संबंध या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पूर स्थितीमुळे उत्तर भारतासाठी मोदी आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीच्या दृष्टीनेही मोदी काही घोषणा करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती मोठी घोषणा करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Pm Narendra Modi to Address the Nation at 5 Pm Today – Big Announcements Expected)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना काय बोलणार? याकडे भारतासह जगाचे लक्ष लागले आहे. आर्थिक आणि भारताचे विदेशी धोरणावर पंतप्रधान महत्त्वाचे बोलण्याची शक्यता आहे. टॅरिफ, H-1B व्हिसा आणि GST मधील होत असलेला बदल, यावर बोलण्याची शक्यता आहे.

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण देशाची अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर पंतप्रधान बोलू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याशिवाय उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांत पावासमुळे प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. त्याबाबत मोठ्या मदतीची घोषणाही केली जाऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ११ वर्षांमध्ये स्वदेशीचा नारा दिला आहे. भारतीय नागरिकांना दैनंदिन जीवनात भारती उत्पादनांचा वापर वाढवण्याचं नेहमीच आवाहन केलेय. स्वदेशी वस्तू वापरल्यामुळे फक्त आर्थव्यस्था वाढत नाही तर आत्मनिर्भरता आणि सांस्कृतिक गौरव वाढवण्याची संधी असल्याचे मोदींनी वारंवार सांगितलेय. देशातील लोकांना रोजगार निर्मितीसाठी प्रत्येकाने स्वदेशी वस्तू, उत्पादनांचा वापर करावा, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : दूध आणायला गेलेल्या बहिण भावाचं अपहरण, रणरागिणीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, नेमकं काय घडलं?

Crime News : भजन ऐकायला निघाली, वाटेत अडवलं अन् मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार

Maharashtra Live News Update: वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल

Pregnancy Care: प्रसूतीनंतर केस गळतीची भीती? तज्ज्ञ सांगतात खरे कारण आणि उपाय

SCROLL FOR NEXT