TVK Rejects CEC Resignation Demand, Backs SIR Transparency Gyanesh Kumar Row Saam Tv
देश विदेश

Political News : इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधींना झटका! थलपति विजय यांनी घेतला मोठा निर्णय

Gyanesh Kumar Resign TVK And Rahul Gandhi Congress News : CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वाद वाढला आहे. TVKने काँग्रेसला साथ न देता आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला विरोध केला आहे.

Alisha Khedekar

  • SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत राजकीय वाद

  • TVKने काँग्रेसला साथ न देता आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला विरोध केला

  • TVKने SIR प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार यादीतील बदलांचा मुद्दा पुढे केला

देशात सध्या निवडणूक आयोग आणि SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक होणार असून पुढील काही दिवसांत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. मात्र, अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे आणि सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK)चे प्रमुख थलपति विजय यांनी ज्ञानेश कुमार यांच्या मागणीला नकार दिला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका अहवालानंतर निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंह संधू यांनी गेल्या १० महिन्यांमध्ये SIR प्रक्रियेबाबत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचं समोर आलं. त्यानंतर विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्यांच्या राजीनाम्याची आणि कारवाईची मागणी केली जात आहे.

मात्र, TVKने CECच्या राजीनाम्याच्या मागणीऐवजी SIR प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. राजमोहन यांनी सांगितलं की, विजय यांनी सत्तेत येण्यापूर्वीच SIR प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी मागणी केली होती. SIR दरम्यान निवडक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. TVKचे वरिष्ठ नेते आणि तमिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री ए. राजमोहन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीला पदावरून हटवल्याने व्यवस्था बदलणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन यांनीही CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. डीएमकेने इंडिया आघाडीचा भाग नसतानाही संसदेत CEC यांच्या विरोधातील हटवण्याच्या प्रस्तावाला समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तमिळनाडूतील सत्ताधारी आघाडीतच या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात शिक्षक मतदारसंघात मतदार यादीमध्ये घोळ, सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Maharashtra Drought: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, विनाकारण सुट्टी घेतल्यास होणार फौजदारी कारवाई

Drishyam 3 : विजय साळगावकर पुन्हा येतोय! २ ऑक्टोबरला अजय देवगणच्या 'दृश्यम ३'चा थरार, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई

Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Thane News: शिवसेना नेत्याच्या मृत्यू प्रकरणाचा दुसरा VIDEO समोर, गोळीबाराचा आवाज ऐकून पळापळ

SCROLL FOR NEXT