Russian Miltary Plane Crash Viral Video: Saamtv
देश विदेश

Russian Military Plane Crash: रशियात लष्करी विमानाचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू; थरारक VIDEO

Russian Military Plane Crash Viral Video: विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याने विमान कोसळले.घटनेच्या वेळी विमानात १५ जण होते. या सर्व १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Gangappa Pujari

Russian Military Plane Crash:

रशियातून मोठी बातमी समोर येत आहे. रशियातील लष्करी मालवाहू विमान मंगळवारी उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याने विमान कोसळले.घटनेच्या वेळी विमानात १५ जण होते. या सर्व १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रशियामध्ये एक मोठा विमान अपघात झाल्याची बातमी आहे. लष्करी वाहतूक विमानाला हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. टेक ऑफ करताना विमान कोसळले. त्यात सुमारे 15 जण होते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी उड्डाण केल्यानंतर लगेचच रशियाचे IL-76 हे लष्करी मालवाहू विमान क्रॅश झाले. अपघातावेळी विमानाच्या एका इंजिनला आग लागली. इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी विमानामध्ये १५ जण होते. या सर्वांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातावेळी विमानात 8 क्रू मेंबर्स आणि 7 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणीही वाचले नसल्याची माहिती रशियन ऑनलाइन मीडियाने दिली आहे. मॉस्को टाईम्सने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. विमानाला आग लागल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानाच्या इंजिनला आग लागली असून ते खाली कोसळताना दिसत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT