Arvind Kejriwal On Congress ANI
देश विदेश

Arvind Kejriwal Bail: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच

Arivind Kejriwal Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे.

Gangappa Pujari

दिल्ली. ता. १२ जुलै २०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. पण सध्या केजरीवाल हे सीबीआयच्या कोठडीत असल्याने केजरीवाल यांचा जेलच्या बाहेर येण्याचा मार्ग खडतर आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. पण त्यांना तुरुंगातून बाहेर येण्याची वाट बिकट आहे. कारण हा जामीन त्यांना ईडीच्या प्रकरणात मिळाला आहे आणि ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांचा मुक्काम जेलमध्येच असण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे याप्रकरणाचा खटला अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणी १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतरच अरविंद केजरीवाल बाहेर येणार की जेलमध्येच राहणार? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आपकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. सत्यमेव जयते असे म्हणत आपने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT