Arvind Kejriwal Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal News: ब्रेकिंग! दिल्ली CM अरविंद केजरीवालांना कोठडीतच राहावं लागण्याची शक्यता; सुनावणीत काय घडलं?

Arvind Kejriwal Arrest Live Updates: कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने तात्काळ त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. २२ मार्च २०२४

Arvind Kejriwal News:

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली आहे. अटकेनंतर आज (२२, मार्च) अरविंद केजरीवाल यांना राऊज इव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणाची सुनावणी कोर्टात पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा आजचा मुक्काम कोठडीतच असण्याची शक्यता आहे.

ईडीकडून जोरदार युक्तीवाद..

यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची माहिती नातेवाईकांना दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. असे सांगत अटकेसंदर्भात २८ पानांची कागदे ईडीकडून न्यायालयाला सुपुर्त करण्यात आली. तसेच या सगळ्या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार अरविंद केजरीवाल आहेत. या घोटाळ्यातून झालेल्या पैशाचा वापर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी केला गेला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला.

केजरीवाल हेच मुख्य आरोपी.. ईडीचा दावा

तसेच "याच प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना जामीन मिळालेला नाही. ही सगळी पॉलिसी बनवनण्यात केजरीवाल यांचा हात असून विजय नायर हा केजरीवाल यांच्यासाठी काम करत होता," असा मोठा आरोपही ईडीकडून करण्यात आला आहे.

विरोधकांची निवडणूक आयोगात धाव..

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली असून अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत निवडणूक आयोगात तक्रार देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून के सी वेणुगोपाल, संदीप पाठक, तसेच समाजवादी पार्टीचे जावेद अली खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Historic Places : नर्मदा तटावरील राजेशाही वैभव, 'या' किल्ल्याचे रूपांतर झाले लग्जरी हॉटेलमध्ये, पर्यटकांची होते गर्दी

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT