SEVEN BULLETS FIRED AT CONGRESS LEADER'S SUV IN BIHAR'S BEGUSARAI AI Image
देश विदेश

Breaking News : मोठी बातमी! भरदिवसा काँग्रेस नेत्याच्या कारवर 7 गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Bihar Congress Leader Firing Case News : बिहारच्या बेगुसरायमध्ये काँग्रेस नेते गौरव कुमार यांच्या सफारी गाडीवर दुचाकीस्वार अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला. गाडीवर सात गोळ्या लागल्या असून गौरव कुमार यांच्यासह तिघेही सुखरूप बचावले.

Alisha Khedekar

  • बिहारच्या बेगुसरायमध्ये काँग्रेस नेते गौरव कुमार यांच्या गाडीवर भरदिवसा गोळीबार

  • दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गाडीचा पाठलाग केला

  • गोळीबारात गौरव कुमार यांच्या सफारी गाडीवर सात गोळ्या लागल्याची माहिती

  • सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही

बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी काँग्रेस नेते गौरव कुमार यांच्या गाडीवर भरदिवसा गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या हल्ल्यात गौरव कुमार यांच्यासह गाडीतील तिघेही सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव कुमार हे बेगुसराय जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. बुधवारी दुपारी ते पपरौर येथील खासगी काम आटोपून आपल्या सफारी गाडीतून बेगुसरायच्या दिशेने जात होते. यावेळी पपरौर कब्रस्तानाजवळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत अचानक गोळीबार सुरू केला.

हल्लेखोरांनी एकापाठोपाठ अनेक गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गाडीवर तब्बल सात गोळ्या लागल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळी गाडीत चालकासह एकूण तीन जण होते. गोळीबार सुरू असताना सर्वांनी प्रसंगावधान राखले आणि सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर दुचाकीवरून बेगुसरायच्या दिशेने पळून गेले. गौरव कुमार यांना हल्लेखोरांची ओळख पटवता आली नाही. घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जीरोमाइल सहाय्यक पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर-2 च्या डीएसपी दुर्गा शक्ती यांनी घटनास्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळी परिस्थितीमुळे खत विक्रीवर परिणाम

Shubman Gill: पहिल्याच टेस्टमध्ये ड्रामा; अंपायरच्या निर्णयाने शुभमन गिलचा पारा चढला! नेमकं काय घडलं?

दिसायला अगदी सुंदर फ्रॉक, पण हा आहे केक! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Political News: खासदाराला कोर्टाकडून मोठा झटका, घर जप्त करण्याचे दिले आदेश

PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! UPI चार्जबाबत महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT