CJP Team Attacked During School Inspection In Rajasthan Saam Tv
देश विदेश

CJP Attack : सरकारी शाळेची पोलखोल करायला गेलेल्या CJP टीमवर जीवघेणा हल्ला, Video व्हायरल

CJP Attack Rajsthan Video News : जयपूरजवळ सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या CJP टीमवर धक्काबुक्की व मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. आशुतोष रांका यांनी भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Alisha Khedekar

  • जयपूरजवळील रामपुरा-कंवरपुरा CJP च्या टीमला मारहाण

  • सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेले असता मारहाण

  • CJPचे आशुतोष रांका यांनी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला

  • भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा

दिल्लीतील जंतर मंतर येथे यशस्वी पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर CJP ने 'स्कुल ठीक करो' अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत सीजेपीची टीम शाळेत जाऊन तेथील शिक्षण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. अशातच राजस्थानची राजधानी जयपूरजवळील रामपुरा-कंवरपुरा परिसरातील एका सरकारी शाळेच्या पाहणीसाठी गेलेल्या CJP च्या टीमला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. CJPचे आशुतोष रांका यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचे रांका यांनी म्हटलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रांका यांनी शुक्रवारी सकाळी घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये काही लोकांची गर्दी जमलेली आहे. या गर्दीत दोन गटात धक्काबुक्की होताना आणि अरेरावी होताना दिसत आहे. हा व्हिडिओ रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी शाळेजवळचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रांका यांच्या आरोपानुसार, संबंधित सरकारी शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब परिस्थितीत सुरू आहे. त्यांनी दावा केला की, शाळा चक्क म्हशींच्या तबेल्यात भरत असून अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. या परिस्थितीची पाहणी करून ती सुधारण्यासाठी CJPची टीम तेथे पोहोचली होती. मात्र, टीम तेथे पोहोचताच काही लोकांनी त्यांना विरोध करत धक्काबुक्की केल्याचा आरोप रांका यांनी केला.

“मुलांनी अशा परिस्थितीत शिक्षण घ्यावे हे भाजपला मान्य आहे, पण शाळेची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध केला जात आहे,” अस रांका यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं . यानंतरच्या एका पोस्टमध्ये रांका यांनी विरोध करणारे लोक स्थानिक ग्रामस्थ नसून भाजपने बोलावलेले गुंड असल्याचा दावा केला. त्यांनी कमल प्रधान नावाच्या व्यक्तीवर गंभीर आरोप करत तो या लोकांचा प्रमुख असल्याचे म्हटले.

CJPचे अभिजीत दीपके यांनीही राजस्थान पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. शाळांमध्ये पाहणीसाठी जाणाऱ्या CJP स्वयंसेवकांवर हल्ला होत असताना पोलीस मूक गिळून गप्प बसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या घटनेवर भाजप किंवा संबंधित व्यक्तींकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : नांदेड हादरलं! १० वर्षीय विर्द्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; मुख्यध्यापकाने जबरदस्ती केली अन्...

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूककोंडी; ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Ration Card : केशरी रेशन कार्ड काढायचंय? उत्पन्न मर्यादा किती अन् काय कागदपत्र लागणार? वाचा एका क्लिकवर

Working Woman Mangalsutra Designs: वर्किंग वुमनसाठी बेस्ट 1 ग्रॅममध्ये सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Ashutosh Ranka: आधी जमिनीवर पाडलं, नंतर दोरी अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण; आशुतोष रांकालाही सोडलं नाही, धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT