Bengaluru Congress Leader Attack Saam Tv
देश विदेश

Political News : भररस्त्यात दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Bengaluru Congress Leader Attack : बंगळूरच्या अंकोलात काँग्रेस नेते गोपाळकृष्ण नायक यांच्यावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला करण्यात आला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अंकोलात काँग्रेस नेत्यावर चाकूहल्ला

  • चार आरोपी अटकेत, दोन फरार

  • दोघे गंभीर जखमी; उपचार सुरू

  • पूर्वनियोजित हल्ल्याचा संशय

Bengaluru Congress Leader Gopalkrushna Nayak Attack बंगळूरच्या अंकोलामध्ये काँग्रेस नेत्यावर दिवसाढवळ्या भीषण हल्ला करण्यात आला आहे. सदर घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या नेत्याचं नाव गोपाळकृष्ण नायक असे आहे. या हल्ल्यात नायक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ६ हल्लेखोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. तर दोघांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास नायक एका सलूनमध्ये गेले होते. सलूनमधून बाहेर पडताच त्यांना ६ जणांच्या टोळीने गाठलं. या सहा जणांच्या टोळीने नायक यांच्या पोटात आणि डोक्यात अनेक वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यात नायक गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीलासुद्धा गंभीर दुखापत झाली.

दोघांनाही तातडीने अंकोला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांच्या गाडीवर गोव्याचा नंबर होता. याचाच अर्थ ते गोव्यावरून आल्याची शक्यता असून हल्लेखोर हल्ला केल्यानंतर गोव्याच्या दिशेने लगेचच पळून जाण्याचा प्रयत्न करत केला. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे आणि वेगवान कार्यामुळे चार आरोपींना माजली चेकपोस्टजवळ ताब्यात घेण्यात आले. इतर दोन संशयित अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेले चार आरोपी हल्ल्यासाठी वापरलेली गाडी मागे सोडून टॅक्सीने गोव्याच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांनी हट्टीकेरी टोलनाका ओलांडला होता आणि ते गोवा सीमेच्या जवळ पोहोचले होते, तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा माग काढला आणि कारवार व गोवा सीमेवरील शहर असलेल्या माजली येथे त्यांना अडवले.तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की हा हल्ला एक पूर्वनियोजित हत्या होती. दरम्यान या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT