China Shanxi Fire Saamtv
देश विदेश

China Shanxi Fire: चीनमध्ये अग्नितांडव! कोळसा कंपनीच्या इमारतीला भीषण आग; २५ जण होरपळले | VIDEO

China Fire News: उत्तर शांक्सी प्रांतातील लुलियांग येथे कोळसा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली.

Gangappa Pujari

China FIre News:

चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. चीनमधील उत्तर शांक्सी प्रांतातील लुलियांग येथे कोळसा कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. (China Breaking News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (१६, नोव्हेंबर) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चीनमध्ये एक भीषण आगीची घटना घडली. शांक्सी प्रांतातील लुलियांग शहर लिशी जिल्ह्यातील योंगजू कोळसा कंपनीच्या चार मजली इमारतीला भीषण आग लागली. दुर्घटनेनंतर बघता बघता आगीने उग्ररुप धारण केले. या दुर्दैवी घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला असून ५१ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र या आगीत या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तपास पथक आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आग लागलेल्या इमारतीमधून आत्तापर्यंत एकूण 63 लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 51 जणांना उपचारासाठी लुलियांग फर्स्ट पीपल्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT