Pregnant Woman Dies From Electrical Shock Saamtv
देश विदेश

Pregnant Woman Death: मोबाईल चार्ज करताना एक चूक जीवावर बेतली! गर्भवती महिलेचा दुर्देवी मृत्यू; बाळही दगावले

Pregnant Woman Dies From Electrical Shock: छोट्याशा चुकीमुळे झालेल्या या दुर्घटनेत महिलेसह तिच्या बाळालाही जीव गमवावा लागला.

Gangappa Pujari

SmartPhone Blast: स्मार्टफोनच्या स्फोटामुळे मोठ्या दुर्घटना झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. ब्राजीलच्या कँपीना ग्रँडेमध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना घडली. जेनिफर कॅरोलायने नावाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. छोट्याशा चुकीमुळे झालेल्या या दुर्घटनेत महिलेसह तिच्या बाळालाही जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेनिफर कॅरॉलाईन असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बाथरुममधून अंघोळ करुन बाहेर आली होती, आणि ओल्या हातांनीच आपला फोन चार्जिंगला लावत होती. एक्स्टेंशन कॉर्डने फोन चार्जिंगला लावताना, अचानक त्यात करंट आला आणि जेनिफरला वीजेचा धक्का बसला.

या घटनेनंतर महिलेचा पती धावून आला. जोपर्यंत नवरा धावत आत गेला तोपर्यंत ती जमिनीवर पडली होती. पतीने तात्काळ मोबाइल इमरजेंसी केयर सर्व्हिस (एसएएमयू) ची टीम त्याच्या घरी पोहोचली मात्र उपचाराआधीच त्यांनी तिला मृत घोषित केले. संबंधित महिला ९ वर्षाची गर्भवती होती, मात्र या दुर्घटनेत तिच्या बाळाचाही मृत्यू झाला.

मोबाईल वापरताना या चूका टाळा...

स्मार्टफोन ही आजच्या काळातील महत्वाचे साधन असले तरी ते वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फोन वापरताना काही गोष्टी प्रकर्षाने टाळा...

  • ओल्या हातांनी मोबाईल चार्जिंगला लावणे टाळा.

  • रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपू नका, किंवा मोबाईल रात्रभर चार्ज करणे टाळा.

  • मोबाईल चार्ज करताना ओरिजनल केबलचाच वापर करा..

  • मोबाईल १००% चार्ज करणे टाळा. तसेच २० टक्क्यांपेक्षा कमी असल्यावरच चार्जिंगला लावा. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT