Allahabad University Bomb Blast Saam Digital
देश विदेश

Allahabad University Bomb Blast: अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात बॉम्ब बनवताना स्फोट, उत्तर प्रदेशमध्ये खळबळ

Allahabad University Bomb Blast: अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. बॉम्ब बनवणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Sandeep Gawade

Allahabad University Bomb Blast

अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. बॉम्ब बनवणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असून बॉम्ब नेमका कशासाठी बनवत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबाद विद्यापीठाचा एमएचा विद्यार्थी प्रभातयादव पीसी बॅनर्जी वसतिगृहाच्या खोलीत बॉम्ब बनवत होता. यादरम्यान अचानक मोठा बॉम्बचा स्फोट झाला. यात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सोबत असलेला दुसरा विद्यार्थीही जखमी झाला आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा विद्यार्थी वसतिगृहात स्वयंपाक बनवताना हा स्फोट झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान हा विद्यार्थी बॉम्ब कशासाठी बनवत होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच जखमी विद्यार्थ्याला एसआरएन रुगणालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT