Bomb Blast At Police Station In Pakistan's Swat SAAM TV
देश विदेश

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात पोलीस स्टेशनमध्ये बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी; पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

Bomb Blast At Police Station In Pakistan's Swat: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवक दु:ख व्यक्त करत हल्लेखोरांचा निषेध केला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे शरीफ म्हणाले.

Chandrakant Jagtap

Pakistan News: पाकिस्तानच्या स्वातमधील (Swat of Pakistan) दहशतवादविरोधी विभागाच्या (CTD) पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला. या झालेल्या स्फोटात किमान 12 पोलीस अधिकारी ठार झाले, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिओ टीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पोलीस ठाण्यात दोन स्फोट होऊन संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली असे पोलिसांनी सांगितले.

जगभरात दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानलाच आता त्याचा फटका सहन करावा लागत आहे. स्वात जिल्ह्यात सोमवारी रात्री एका पोलीस ठाण्यावर आत्मघातकी हल्ला झाला. या पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी विभागाचे (CTD) कार्यालय आहे. या हल्ल्यात 12 पोलीसांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हणत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पोलीस स्टेशनवरच हल्ला

पाकिस्तानातील स्वात जिल्ह्याचे डीपीओ स्वात शफीउल्ला यांनी सांगितले की हा स्फोट सीटीडीच्या स्वात जिल्ह्यात कबाल पोलीस ठाण्यात झाला. या स्फोटामुळे तीन इमारती कोसळल्या आणि त्यानंतर भीषण आग लागली. हा आत्मघाती हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या हल्ल्यात एकूण 12 पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8.20 वाजता हा हल्ला झाला. आत्मघातकी हल्लेखोराने पोलीस ठाण्यातच स्वत:ला उडवून घेतले. या पोलीस ठाण्याच्या आवारात सीटीडीचे कार्यालय आणि मशीद बांधली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण खैबर पख्तूनख्वाह प्रांतात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

ढिगाऱ्याखाली दबलेले लोक

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या जखमींनी सांगितले की, स्फोटानंतर पोलीस ठाण्याच्या इमारती कोसळल्या. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून अनेक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता पाहता जवळच्या रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. (Pakistan News)

पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवक दु:ख व्यक्त करत हल्लेखोरांचा निषेध केला आहे. शरीफ यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानातील जनता शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली जाईल. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारतीय कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT