Diplomatic tensions rise after controversial remarks by former Pakistan envoy Abdul Basit. saam tv
देश विदेश

"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणाव वाढणार?

India-Pak Tensions: पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप उसळला असून, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Bharat Jadhav

पश्चिम-आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देताना बासित यांनी हे विधान केलंय. "जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केले पाहिजे." एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओकली.

कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावी, असं विधान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलंय. बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचे बासित यांचे विधान तर्कहीन मानले जातंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र, थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT