Syria Masjid Blast  Saam tv
देश विदेश

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

सीरीयामध्ये मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

Vishal Gangurde

अल्पसंख्याक समुदायाच्या मशिदीत घडला मोठा स्फोट

स्फोटात कमीत कमी १२ लोकांचा मृत्यू

स्फोटात २१ जण जखमी झाले

सीरियाच्या होम्स शहरातील अलावी अल्पसंख्याक समुदायाच्या मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात कमीत कमी १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाच्या होम्स शहरात अलावाइट मुस्लिम समुदायाच्या इमाम अली इब्न अबी तालिब मशिदीत शुक्रवारी मोठा स्फोट झाला. या मशिदीत नमाजासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. नमाजासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमले होते. त्यावेळीच मोठा स्फोट झाला.

स्थानिक मीडियानुसार, प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला कमीत कमी ५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नजीब अल-नासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर सुरक्षा दलाच्या जवानांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाने पुढील तपास सुरू केला आहे.

मशिदीतील प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, मशिदीतील नमाजाच्या हॉलमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात मशिदीचं छत आणि भिंत कोसळली. स्फोटानंतर बचाव पथकाने तीन पुरुषांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दुर्घटनेत काही महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत.

सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नजीब अल-नासन यांनी म्हटलं की, स्फोटानंतर आता सुरुवातीचे आकडे आहेत. एका संशयित दहशतवाद्याचा तपास सुरू आहे. तपासासाठी शहरभर नाकाबंदी लावली आहे.

स्फोटाची घटना कुठे घडली?

होम्स शहरातील इमाम अली इब्न अबी तालिब मशिदीत ही घटना घडल्याची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT