Rahul Gandhi Viral Video, Rahul Gandhi Pub Video, Controversy of Rahul Gandhi Pub Video Saam Tv
देश विदेश

नेपाळच्या प्रसिद्ध नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी? व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. नेपाळच्या (Nepal) सुप्रसिद्ध पबमध्ये राहूल गांधी दिसले असल्याचा, आरोप (Allegations) भाजप कडून करण्यात आला आहे. राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडिओ (Video) देखील भाजपच्या (BJP) नेत्यांनी शेअर केला आहे. दरम्यान त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Controversy of Rahul Gandhi Pub Video)

पाहा व्हिडिओ-

यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भाजपने काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. हा व्हिडिओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मात्र राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार (Government) आहे. राजस्थान तिकडं जळत आहे.

हे देखील पाहा-

यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. असा निशाणा पूनावाला यांनी राहूल यांच्यावर यावेळी साधला आहे. पूनावाला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष संपला, पण राहुल गांधींचा पार्टी अशीच चालणार आहे. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा त्यांच्या पक्षाला आणि देशातील जनतेला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत. राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहूल गांधीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. सुट्टी, पार्टी, सहली, खाजगी परदेशी भेटी इत्यादी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत.

दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा ट्विट करून म्हणाले आहेत की, हा राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय नाही. राहुल गांधी कोणासोबत आहेत? चीनच्या एजंट सोबत आहेत का? राहुल गांधींनी लष्कराविरोधात जे ट्विट केले होते ते चीनच्या दबावाखाली आहे का? प्रश्न विचारले जातील? कारण हा प्रश्न राहुल गांधींचा नसून देशाचा असल्याचे प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. त्यांच्यात सातत्य आहे. असे ट्वीट भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी यावेळी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT