BJP President Wire
देश विदेश

BJP President: भाजपा नवा अध्यक्ष याच आठवड्यात ठरणार, महाराष्ट्रातील नेत्यासह ४ जणांच्या नावाची चर्चा

BJP National President Update: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. याच आठवड्यात भाजपचा नवा अध्यक्ष ठरणार आहे. ४ जणांची नावं चर्चेत आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे काही दिवसात समोर येईल.

Priya More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचं नाव आता जाहीर होणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणा-कोणाच्या नावाची चर्चा होत आहे त्यांची नावं देखील समोर आली आहेत. भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. भाजपच्या नव्या अध्यक्षाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

भाजपच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये प्रादेशिक संतुलन, महिला नेतृत्व, दलित प्रतिनिधीत्व आणि संघटन कौशल्य या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये काही दिवसातच निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT