Kangana Ranaut Saam Tv
देश विदेश

Kangana Ranaut: शेतकरी आंदोलनाविरुद्ध केलं वक्तव्य, कंगना रणौत यांना भाजपने सुनावले खडेबोल

BJP On Kangana Ranaut : खासदार कंगना राणौत यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यातच आता भाजपने एक पत्रक जाहीर करत स्वतःला यापासून वेगळं केलं आहे.

Satish Kengar

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनाविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यातच आता भाजपने एक पत्रक जाहीर करत स्वतःला यापासून वेगळं केलं आहे. कंगना राणौत यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं या पत्रकात सांगण्यात आलं आहे.

भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नका, असा सल्ला भाजपने कंगना राणौत यांना दिला आहे. पत्रक जारी करत पक्षाने म्हटले आहेत की, कंगना रणौत यांना धोरणात्मक बाबींवर बोलण्याची परवानगी नाही किंवा त्यांना पक्षाच्या वतीने वक्तव्य करण्यासही परवानगी नाही.

खासदार कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेलं वक्तव्य हे पक्षाचे मत नाही, असे भाजपने स्पष्ट केलं आहे. कंगना राणौत यांच्या वक्तव्यावर भाजपने असहमती व्यक्त केली आहे.

'भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नये'

कंगना राणौत यांना भाजपने भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नये, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, कंगना राणौत यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबचे बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असं वक्तव्य केलं होतं. कंगना राणौत यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

याआधीही शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी असे अनेक वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात संतापाचा भडका उडाला होता. तसेच चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफ जवानाने त्यांना कथित कानशिलात लागवल्याची घटनाही घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT