BJP BIG RESHUFFLE: NEW STATE PRESIDENTS APPOINTED IN 4 STATES Saam tv
देश विदेश

BJP Reshuffle: भाजपमध्ये मोठा फेरबदल, थेट ४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

BJP Reshuffle: तीन राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर भाजपने दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि त्रिपुरामध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भाजपने आता मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची घोषणा केली आहे.

Bharat Jadhav

  • भाजपने चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले.

  • दिल्ली भाजपची जबाबदारी हर्ष मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आली.

  • पंजाब, हरियाणा आणि त्रिपुरामध्येही नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त.

पाच राज्याच्या विधानसभेपैकी तीन राज्यात भाजपचं कमळ फुललं आहे. तीन राज्यातील विधानसभेत विजय मिळवल्यानंतर भाजपनं पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहे. भारतीय जनता पक्षानं आता संघटनात्मक बदल करण्यावर भर दिला आहे. भाजप आपल्या पक्षात मोठा फेरबदल केला आहे. पक्षाने चार राज्यांच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. सरदार केवल सिंग ढिल्लन यांची पंजाब भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिषेक देवरे यांची त्रिपुरा भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने आपल्या पक्षात भाकरी फिरवली असून चार राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलली आहेत. केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा ​​यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्ष पदी म्हणून नियुक्त करण्यात आलंय.आधी हे पद वीरेंद्र सचदेव यांच्याकडे होतं.

याशिवाय अर्चना गुप्ता यांची हरियाणाच्या, केवल सिंग ढिल्लन यांची पंजाबच्या आणि अभिषेक देबरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चार राज्याचे अध्यक्ष बदलल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा ​​यांची भाजप दिल्ली राज्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होईल."

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा ​​कोण आहेत? Who is Harsh Malhotra?

हर्ष मल्होत्रा ​​हे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे खासदार आहेत. ते सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत. संघटनात्मक राजकारणातील एक जुने जाणकार असून मल्होत्रा ​​यांनी दिल्ली भाजपमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जनसंपर्क, संघटनात्मक क्षमता आणि विकासाच्या मुद्द्यांवरील त्यांच्या सक्रिय भूमिकेसाठी ते ओळखले जातात.

कोण आहे हरियाणाच्या प्रदेशध्यक्षा (Who is Haryana State President?)

डॉ. अर्चना गुप्ता (Dr. Archana Gupta) यांची हरियाणा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अर्चना गुप्ता या हरियाणातील भाजपच्या एक सक्रिय नेत्या आहेत. संघटनात्मक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून महिला नेतृत्व मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्या संघटनेचा विस्तार करतील आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करतील अशी अपेक्षा आहे.

पंजाब भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत?

केवल सिंग ढिल्लन हे बरनाला मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिलेत. त्यांनी २०२२ ची संगरूर लोकसभा पोटनिवडणूक आणि २०२४ ची बरनाला विधानसभा पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. ढिल्लन हे देश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी एक प्रमुख उद्योगपती आहेत. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळचे आहेत.

बरनालाच्या लोकांमध्ये ते एक विकासवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी कधीही त्यांचा राजकीय संघर्ष राहिला नाहीये.

त्रिपुराचे प्रदेशध्यक्ष कोण आहेत?

अभिषेक देबरॉय हे त्रिपुरा भाजपचे एक सक्रिय नेते आहेत. त्यामुळे त्यांची आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते बऱ्याच काळापासून संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी पक्षाच्या विविध प्रचार मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याकडून संघटना अधिक मजबूत करून त्रिपुरामधील पक्षाचा पाठिंबा वाढवण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT