BJP New Team Saam Tv
देश विदेश

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

Political News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज घोषणा होणार आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन नावं जाहीर करतील. संभाव्य यादी समोर आली आहे.

Priya More
  • भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची आज घोषणा होण्याची शक्यता

  • भाजपच्या नव्या टीममध्ये कोणाला कोणती जबाबदारी मिळणार

  • भाजप राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश

  • भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये ज्येष्ठ आणि युवा नेत्यांना संधी

केंद्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पार्टी आज आपल्या नव्या कार्यकारणीची घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन अनेक नेत्यांना संधी देऊ शकतात.अनुभवी नेत्यांवरही पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांनाही जबाबदाऱ्या मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून पक्ष संघटनात्मक स्तरावर मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे जी संभाव्य यादी समोर आली आहे त्यामध्ये माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा देखील समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये १० उपाध्यक्ष, ८ महासचिव, १ संघटन महासचिव, २ सह-संघटन सचिव, तसंच १४ मंत्री, १ खजिनदार, २ सह-खजिनदार, १ माध्यम प्रभारी आणि २ सह-माध्यम प्रभारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सुनील बन्सल, विनोद तावडे, अरुण सिंह आणि तरुण चुघ यांची महासचिव म्हणून पुनर्नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या नव्या टीममध्ये धर्मेंद्र प्रधानही -

भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यकारणीमध्ये स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, बिप्लब देव, हरीश द्विवेदी, महेंद्र सिंह, अनिल बलूनी, विनोद सोनकर, सतीश पुनिया, सीपी जोशी, श्रीकांत शर्मा, तेजस्वी सूर्या, राघव चढ्ढा, महादेव शर्मा, महादेव शर्मा, डॉ. राविण शर्मा, डॉ. सरोज पांडे यांच्यासह राजू बिस्ता, संजय जयस्वाल, सुरेंद्र नागर, विवेक ठाकूर, संबित पात्रा, कमलजीत अहलावत, अलका गुर्जर, संजीव बालियान आणि सुष्मिता देव याा सर्व नेत्यांना पक्षाकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शकता आहे.

भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये बी. एल. संतोष संघटन मंत्री म्हणून कायम राहतील. शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांना सह-संघटन मंत्री म्हणून जबाबदारी कायम राहण्याची शक्यता आहे. तर राज्य प्रभारींमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. बी. बी. शर्मा यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नव्या कार्यकारणीमध्ये अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसोबत तरुण चेहऱ्यांना देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

Famous Actress : ट्रेनमध्ये कपडे काढले, RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

Jowar Bhakri: ज्वारीची भाकरी करताना कडा फुटतात? ‘या’ ४ टिप्स वापरा, भाकरी बनेल टम्म फुगलेली!

SCROLL FOR NEXT