Kangana Ranaut’s stand on the Gen Z protest has triggered a fresh controversy saam tv
देश विदेश

Kangana Ranaut: कंगना रनौतच्या उलट्या बोंबा सुरूच; राखी सावंतची कंगनाला चोपण्याची भाषा

Gen Z Protest Controversy : GEN-Z च्या आंदोलनावर कंगना रनौतनं घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळून आलाय. सलग दुसऱ्या दिवशी कंगनाच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत. आता भाजपच्या मंत्र्यानेच कंगनाला सल्ला दिलाय. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट.

Rohit Kadam

  • GEN-Z आंदोलनावरील कंगना रनौतच्या भूमिकेवरून वाद उफाळला.

  • सलग दुसऱ्या दिवशी कंगनाच्या वक्तव्यांची चर्चा सुरू असल्याचा दावा.

  • राखी सावंतने कंगनावर तीव्र टीका करत चोपण्याची भाषा केल्याचे वृत्त.

जंतरमंतरवरील जेन झी आंदोलकांवर बरलणाऱ्या कंगना रनौतनं आपली बेताल ब़डबड सुरूच ठेवलीय. कंगनाच्या आंदोलकांबाबतच्या आक्षेपार्ह पोस्टवर देशभरातून टीकेची झोड उठली. उलट उलट्या बोंबा मारणाऱ्या कंगनानं मीडियावरच आपलं खापर फोडलं असून आपला हेका कायम ठेवलाय. तर सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंनी कंगनाचा समाचार घेतलाय.

कंगनाचा विरोधी पक्षातल्या महिला नेत्या आणि अभिनेत्रींनीही तिखट शब्दात टीका केलीय. राखी सावंतनं तर कमंगनाला थेट ठोकून काढण्याची भाषा केलीय. तर कंगनानं नको ते तारे तोडल्यामुळे आता भाजपच्या मंत्र्यांचीही अडचण झालीय. त्यामुळे कंगनाच्या विधानाशी भाजप नेत्यांनी असहमती दर्शवलीय. मंत्री गिरीश महाजन यांनी कंगनाचे कान टोचले आहेत. आंदोलन करणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असताना खासदार असलेल्या कंगनाला याचं साधं भान नाही. त्यामुळे कंगनानं निदान तिची नव्हे तर सत्ताधारी भाजपची तरी प्रतिष्ठा सांभाळण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT