Manaranjan Dhyan Samantara viral video controversy explained saam Tv AI
देश विदेश

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

BJP MLA's Viral Video : ओडिशातील भाजप आमदार मनोरंजन ध्यान सामंतरा यांच्या व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पत्नी मीना साहू यांनी हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केल्याचा आरोप करत बीजेडीच्या सोशल मीडिया टीमवर निशाणा साधलाय.

Bharat Jadhav

  • आमदार मनोरंजन ध्यान सामंतरा यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पत्नी मीना साहू यांनी हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केल्याचा आरोप केला

  • बीजेडीच्या चिकिती सोशल मीडिया टीमवर व्हिडिओमध्ये फेरफार केल्याचा आरोप

ओडिसामध्ये भाजपच्या एका आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून राजकीय वाद निर्माण झालाय. या व्हिडिओमध्ये, चिकितीचे आमदार मनोरंजन ध्यान सामंतरा हे एका सहकारी मंत्र्याचा कान चावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांची पत्नी मीना साहू यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा व्हिडिओ एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलाय. विरोधी पक्ष 'बीजेडी' (BJD) च्या सोशल मीडिया टीमने या व्हिडिओमध्ये फेरफार करून तो प्रसारित केल्याचा आरोप आमदाराच्या पत्नीनं केलाय.

पत्नीने दुसरा व्हिडिओ शेअर केला

मीना साहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर आपल्या पतीचा आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. मीना साहू यांनी हा खरा व्हिडिओ असल्याचे म्हटलंय. यात आमदार मंत्र्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकताना दिसत असल्याचे नमूद केलंय.

मीना साहू यांनी आरोप केला की, बीजेडीच्या चिकिती सोशल मीडिया टीमने आमदाराची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून एक व्हिडिओ तयार केलाय. त्यांनी बेरहामपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची तक्रार करत कठोर कारवाई करण्याची मागणीही मीना साहू यांनी केलाय.

त्यांनी 'एक्स' (X) वर लिहिले की, हा चिकितीच्या आमदारांचा खरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ते मंत्र्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेताना दिसत आहेत. मात्र बीजेडी (BJD) चिकितीच्या सोशल मीडिया टीमने आमदारांची ऑनलाइन बदनामी करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एक बनावट व्हिडिओ तयार केलाय. हा वाद १३ नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे.

त्यादिवशी ओडिसाचे मत्स्यव्यवसाय आणि पशुसंसाधन विकास मंत्री गोकुलानंद मल्लिक हे चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या तीन जिल्ह्यांच्या संदर्भात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बाधित लोकांना भरपाई देण्याच्या आवश्यकतेवरही चर्चा केली होती. त्यावेळी आमदार मनोरंजन ध्यान सामंतरा एका मंत्र्याचा मागे उभे होते. माध्यमांशी बोलत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात तो आपल्या पुरुष साथीदाराच्या जवळ झुकलेला आणि त्याच्या कानाजवळ चावल्यासारखी कृती करताना दिसला.

बीजेडीने शेअर केलेला व्हिडिओ

विरोधी पक्ष बीजेडीनेही हा व्हिडिओ 'एक्स' (X) वर शेअर केलाय. गंजाम जिल्ह्यातील पूरस्थितीचा उल्लेख करत, पक्षाने भाजपवर उपरोधिक टीका केली. बीजेडीने लिहिले की, गंजाम पूरग्रस्त आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आनंदाने उड्या मारत आहेत.

मात्र, या वादाबाबत आमदार मनोरंजन ध्यान सामंतरा किंवा ओडिसा भाजप यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यांच्या पत्नीने असा दावा केला आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ एआय (AI) द्वारे तयार करण्यात आला आहे.

मनोरंजन ध्यान सामंतरा हे ओडिसाच्या गंजाम जिल्ह्यातील चिकिती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यांनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बीजेडी नेत्या उषा देवी यांचा पराभव केला. उषा देवी यांचा त्यांनी ६,५२२ मतांनी पराभव केला होता. या वादाच्या दोन दिवस आधी, सामंतरा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका महिन्याचे वेतन मदत निधीत दान केले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

Green Lake Trek : चार वर्षांनंतर ‘ग्रीन लेक ट्रेक’ पुन्हा सुरू; हिमालयाच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची पर्यटकांना संधी

मोठी बातमी! मुंबईत CNG दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

SCROLL FOR NEXT