BJP MLA hoisted tricolor upside down Saam tv
देश विदेश

BJP MLA : भाजप आमदाराकडून भारताचा अवमान? देशाचा ध्वज उलटा फडकावला; व्हिडिओ व्हायरल

BJP MLA hoisted tricolor upside down : भाजप आमदाराकडून राष्ट्रीय ध्वजाचं चुकीच्या पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आलं. भाजप आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

भाजप आमदाराकडून चुकीच्या पद्धतीने ध्वजारोहण

भाजप आमदार संजय पाठक यांचा व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेशच्या विजयरावगड येथे ही घटना घडली

मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील विजयाघवढ किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी भारताचा ध्वज उलटा फडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनी विजयरावगड किल्ल्यावर आमदार संजय पाठक यांनी चुकीच्या पद्धतीने ध्वजारोहण केलं. या आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा ध्वज उलटा फडकल्यानंतर उपस्थित लोकांनी चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तातडीने ध्वज उतरवून पुन्हा एकदा व्यवस्थित ध्वजारोहण करण्यात आलं. या प्रकरणात आमदार संजय पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

संजय पाठक यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहत म्हटलं की, 'या प्रकरणात जे जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी असतील, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी'. आमदार पाठक यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार पाठक चुकीच्या पद्धतीने ध्वजारोहण करताना दिसत आहेत.

आमदार संजय पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, 'विजयरावगडमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनी आयोजित सरकारी कार्यक्रमात स्थानिक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी ध्वज बांधण्याची जबाबदारी दिली होती. त्यांनी ध्वज चुकीच्या पद्धतीने उलटा बांधला होता. त्यामुळे ध्वजारोहण केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फडकला गेला'.

'ध्वजारोहण करण्याआधी ध्वज चुकीच्या पद्धतीने बांधला गेला होता. ध्वजारोहण केल्यानंतर माझी नजर ध्वजावर गेली. मी तातडीने व्यवस्थित झेंडा व्यवस्थित केला. त्यानंतर पुन्हा एकदा ध्वजारोहण केलं. मात्र, घडलेली घटनेमुळे लोकांच्या भावना दु:खावल्या आहेत. आता या प्रकरणात तपास करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी,जेणेकरून भविष्यात ही चूक पुन्हा होणार नाही'. आमदार संजय पाठक हे मागील टर्ममध्ये मंत्रिमंडाळत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT