देश विदेश

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

BJP MLA’s Bungalow Washed : गुजरातमधील भाजप आमदार बच्चू खाबड यांचा बंगला धुण्यासाठी २४ किलोमीटरवरून फायर ब्रिगेडची गाडी आल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून पालिकेने कुटुंबाकडून ₹२७०० शुल्क वसूल केले.

Namdeo Kumbhar

Bacchu Khabad, Gujarat BJP MLA : भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी बोलावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील भाजप आमदार आणि माजी मंत्री बच्चू खाबड यांचा बंगला धुण्यासाठी थेट २४ किलोमीटर लांबून फायर ब्रिगेडची गाडी मागवण्यात आली होती. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होताच गदारोळ उडाला आहे.

भाजप आमदाराची गाडी धुण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी बोलवण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडिओमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने आमदाराच्या घराच्या बाहेरील भिंती धुताना दिसत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुजरातच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला.

प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून नगरपालिका प्रशासनाने सावरासावर करण्या सुरूवात केली. गाडी पाठवताना ती कोणत्या कामासाठी मागवली आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, प्रकरण जास्त तापल्यानंतर नगरपालिकेने आमदार खाबड यांच्या कुटुंबाकडून २,७०० रुपये शुल्क वसूल केले आहे.

देवगड बरिया नगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेश कलाल म्हणाले, जेव्हा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घराची बाहेरील भिंत धुण्यास सांगण्यात आले. त्यांनी काम सुरू केले आणि अग्निशमन प्रमुखांना बोलावले. अधिकाऱ्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मलाही याबद्दल फोन आला, त्यानंतर मी त्यांना शुल्क आकारण्यास सांगितले.

अग्निशमन अधिकारी मयूर चौहान म्हणाले, आम्हाला नगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेश कलाल यांचा फोन आला आणि त्यांनी आगीची माहिती दिली. मी त्यांना विचारले की हा विशिष्ट फोन आहे की आगीची माहिती आहे. त्यांनी मला अग्निशमन दलाचे वाहन पाठवण्यास सांगितले. आमचे कर्मचारी तिथे पोहोचले, तेव्हा आमदारांच्या माणसांनी त्यांना घराच्या बाहेरील भिंती धुण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फायनान्स कंपनीच्या वसुलीचा आणखी एक बळी; हिंगोलीतही वसुली कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरूच

Alum Water Bath Benefits: तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

7 Hairstyles For Women: महिलांसाठी 7 सोप्या हेअरस्टाइल्स, कोणत्याही लूकवर दिसतील उठून

Gokul Election: गोकूळ जिंकलं, अध्यक्षपदाचं काय? सतेज पाटील कसं जुळवणार सत्तेचं गणित?

Special Report : मंत्रालय पोखरणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त कधी?

SCROLL FOR NEXT