Yogesh Patel death  Saam tv
देश विदेश

भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Yogesh Patel death : भाजप आमदार योगेश पटेल यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तळात शोककळा पसरली आहे.

Saam Tv

भाजप आमदार योगेश पटेल यांचं निधन

योगेश पटेल यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

योगेश पटेल यांना अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

गुजरातमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. गुजरातच्या वडोदरा येथील मांजलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री योगेश पटेल यांचं निधन झालं. योगेश पटेल यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

हृदयाशी संबंधित आजारामुळे योगेश पटेल हे मागील ४ दिवसांपासून वडोदरा येथील रुग्णालयात उपचार घेत होते होते. त्यांनी खासगी रुग्णालयात सोमवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. योगेश पटेल यांच्या जाण्याने भाजपवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश पटेल हे तब्बल आठ वेळा विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी १९९० साली पहिल्यांदा जनता दलाकडून रावपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. पुढे १९९५ साली योगेश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आयुष्यभर भाजपमध्येच राहिले.

योगेश पटेल यांनी १९९५ ते २०१२ पर्यंत रावपुरा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. पुढे २०१२ साली त्यांनी मांजलपूर विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवला. त्यांनी २०१२ सालानंतर मांजलपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने योगेश यांना वयाच्या ७६ व्या वर्षी उमेदवारी देऊन विश्वास दाखवला होता. २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगेश पटेल यांनी बाजी मारली होती.

योगेश पटेल हे २०१९ ते २०२१ सालापर्यंत विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री राहिले आहेत. मंत्रिपद असतानाही त्यांचं मतदारसंघात विशेष लक्ष असायचं. योगेश पटेल यांचा जनसंपर्क दांडगा होता. ते सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर आडकाठी न ठेवता भाष्य करायचे. योगेश पटेल हे विद्यार्थी दशेपासूनच आंदोलनात सक्रिय झाले होते. ते १९७८ साली दूधाच्या दरवाढीवरून केलेल्या आंदोलनावरून चर्चेत आले होते. योगेश पटेल यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT