BjP Master Plan Ready Against Congress madhya pradesh rajasthan chhattisgarh telangana 4 state assembly election result 2023 Saam TV
देश विदेश

BJP vs Congress: भाजपचा मास्टर प्लान तयार, ४ राज्यांच्या निकालाआधीच नवी रणनिती; काँग्रेसचं टेन्शन वाढणार?

Assembly Election Result 2023: चारही राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच निकालाआधी भाजपने मोठा प्लान आखला आहे.

Satish Daud

Assembly Election Result 2023 Marathi News

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून चारही राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच निकालाआधी भाजपने मोठा प्लान आखला आहे.

राजस्थान वगळता अन्य चारही राज्यात भाजपाची पीछेहाट होईल, असा अंदाज विविध एक्झिट पोल एजन्सींनी वर्तवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून भाजप नेत्यांना पराभवाची धास्ती आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपने प्लान बी आखला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसमधील नाराज आमदार आणि अपक्ष आमदारांसोबत भाजपने बोलणी सुरू केल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. चारही राज्यात जे अपक्ष आमदार विजयी होण्याची शक्यता आहे, अशा आमदारांसोबत भाजपने संपर्क साधल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुकीत अटीतटीची लढत पाहता अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या प्लानला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने देखील रणनिती आखली आहे. काँग्रेसने देखील काही अपक्ष आमदार आणि भाजपमधील नाराज आमदारांसोबत संपर्क साधल्याची माहिती आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 निकाल पाहण्याचे येथे क्लिक करा

राजस्थान विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसपासून सावध राहण्यासाठी भाजपने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर तयार ठेवले आहेत.

४ राज्यांमधील एक्झिट पोलचा अंदाज काय?

  • राजस्थानमध्ये भाजपला १०० ते ११० आणि काँग्रेसला ९० ते १०० जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल एजन्सींनी वर्तवला आहे. अपक्षांना ५ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. काँग्रेसला १११ ते १२१ आणि भाजपला १०६ ते ११६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • तेलंगणात के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार तेलंगणात भाजपला फक्त ५ ते १० जागा मिळतील. तर काँग्रेसला ४९ ते ५९ आणि बीआरएसला ४८ ते ५८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांपैकी काँग्रेसला ४६ ते ५६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला ३० ते ४० जागा मिळणार, असा अंदाज एक्झिट पोल एजन्सींनी वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

CCTV Video : काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ, भरधाव वेगातील दुचाकीवर भिंत कोसळली

Hingoli : विद्यार्थ्यांची खाजगी संस्थेत आर्थिक पिळवणूक; प्रवेशासाठी २० हजार रुपये आकारल्याचा आरोप

Jewellery Cleaning Tips : सणासुदीला १ रुपया खर्च न करता दागिन्यांची चमक वाढवा, ५ घरगुती उपाय ट्राय करा

Shocking : घृणास्पद! तरुणाचे भटक्या कुत्र्यावर आक्षेपार्ह कृत्य, अत्याचाराचा Video व्हायरल

SCROLL FOR NEXT