BJP LEADER UMA BHUSHAN TANTI SHOT DEAD IN BIHAR'S BHAGALPUR saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात खळबळ

Bjp Leader Uma Bhushan Tanti Shot Dead In Bihars Bhagalpur: बिहारमधील भागलपूर येथे भाजप मंडळ अध्यक्ष उमा भूषण तांती यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येमागील कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

बिहारमधील भागलपूर येथे शुक्रवारी दिवसाढवळ्या भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना बबरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुतुबगंज परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख उमा भूषण तांती अशी झाली असून ते भाजपमध्ये मंडळ अध्यक्ष पदावर कार्यरत होते. उमा भूषण तांती यांच्या डोक्यात गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या महितीनुसार, काली पूजेसाठी वर्गणी गोळा करण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वर्गणीच्या मुद्यावरून काही लोकांमध्ये वाद झाला होता. याचा वादातून उमा भूषण तांती यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडूनही हत्येचे नेमके कारण सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे कालीपूजेच्या वर्गणीवरून झालेला वादच हत्येचे कारण आहे की यामागे आणखी काही कारण आहे, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या उमा भूषण तांती यांना आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपसणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. वडिलांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांची मुलगी रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयात वडिलांचा मृतदेह पाहताच तिने त्यांना कवटाळून टाहो फोडला. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार रोहित पांडे यांनीही रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. उमा भूषण तांती यांची हत्या नेमकी कोणी केली आणि त्यामागील खरे कारण काय, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. कालीपूजेच्या वर्गणीवरून झालेला वादच या रक्तरंजित हत्येपर्यंत पोहोचला का? की यामागे जुनी वैमनस्य किंवा अन्य कोणते कारण आहे? या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांची सुटका

Best Gift For Wife: बायको खुश होण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट गिफ्ट आयडिया

१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Fat Loss Tips: कमी खाऊनही वजन वाढतंय? पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा 'या' सोप्या ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT