छतीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात भाजप नेते आणि माजी उपसरपंच तरेंद्र बंचोर यांचा मृतदेह एका मंदिर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे जे झाड त्यांनी लावले होते आणि मंदिराच्या कामासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एक मंदीराच्या आवारात एका पुरुषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिला, जवळ जाऊन बघितले असता तारेंद्र बंचोर असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.
कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी तरेंद्र बंचोर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि ते घरी परतले. मात्र, त्यांच्या मृत्यूचा संबंध त्यांच्या प्रकृतीशी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांची चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व बाबींचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे खरे कारण समोर येईल. तरेंद्र बंचोर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनी यापूर्वी उपसरपंचपद भूषवले होते. स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता आणि ते खासदार विजय बघेल यांचे समर्थक मानले जात होते. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने गाव आणि भाजप कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.