उत्तर प्रदेशातील कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये सर्पदंशामुळे गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक आणि भाजप नेते दिनेश चौधरी (वय 67) यांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या ICU मध्ये दाखल केल्यानंतर तब्बल 40 मिनिटे उपचार सुरू झाले नाहीत, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, प्रकरणाच्या चौकशीसाठी मेडिकल कॉलेज प्रशासनाने तीन डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे.
दिनेश चौधरी हे भाजप किसान मोर्चा मंडळाचे ते मंत्री होते. शुक्रवारी सकाळी ते लघुशंकेसाठी घराबाहेर गेले असताना त्यांना सापाने दंश केला. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने मुलगा अजित चौधरी याने खासगी वाहनातून त्यांना कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. अजित चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, ते सकाळी सुमारे 6 वाजून 10 मिनिटांनी वडिलांना घेऊन रुग्णालयाच्या ICU विभागात पोहोचले. मात्र, पुढील 40 मिनिटे उपचार सुरू करण्यात आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. ICU मधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वडिलांना योग्य उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला.
दिनेश चौधरी यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी संताप व्यक्त करत आपत्कालीन विभागातील ड्युटीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपचारात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुशीनगर मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. पी. गोड़ यांनी सांगितले की, चौकशीत आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नातेवाइकांनी उपचारास विलंब झाल्याचा आरोप केला असून, चौकशीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची मदत घेतली जाणार आहे. रुग्णालयात झालेल्या गोंधळामुळे आपत्कालीन विभागातील उपचार काही काळ प्रभावित झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.