BJP leader Dilip Ghosh stepson Sreenjay Dasgupta death case Saam Tv News
देश विदेश

रात्रभर पार्टी, नंतर गोळ्यांचा...; भाजप नेत्याच्या मुलाची हत्या की आत्महत्या? धक्कादायक कारण समोर

BJP Leader Stepson Death Reason : मंगळवारी रिंकू मजूमदार यांचा मुलगा श्रींजय दासगुप्ता न्यूटाऊन येथील सपोर्जी हाऊसिंग येथे बेशुद्धावस्थेत सापडला होता. दासगुप्ता हा आयटी क्षेत्रात नोकरी करायचा.

Prashant Patil

न्यूटाऊन : भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमधील नेते दिलीप घोष यांची पत्नी रिंकू मजुमदार यांचा मुलगा श्रींजय दासगुप्ता याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (१३ मे) सकाळी ७ वाजता श्रींजय न्यूटाऊन येथील त्याच्या राहत्या घरी आढळला. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर श्रींजयला विधाननगर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

मंगळवारी रिंकू मजूमदार यांचा मुलगा श्रींजय दासगुप्ता न्यूटाऊन येथील सपोर्जी हाऊसिंग येथे बेशुद्धावस्थेत सापडला होता. दासगुप्ता हा आयटी क्षेत्रात नोकरी करायचा. बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर त्याला बिधानानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मंगळवारी श्रींजय दासगुप्ता याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. बिधाननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रींजय सोमवारी रात्री उशिरापर्यंत सापुरजी हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथील आपल्या राहत्या घरात मित्रांसोबत पार्टी करत होता. या घरात नाईट पार्टी झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार श्रींजय नेहमीप्रमाणे सोमवारी त्याच्या ऑफिसला गेला होता. संध्याकाळी तो घरी परत आला होता. रात्र झाल्यानंतर त्याचे मित्र घरात येताना दिसत होते. पण हे मित्र नेमके कोण होते, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या मित्रांचा शोध घेत आहेत.

श्रींजयच्या मृतदेहाजवळ काही औषधी गोळ्या मिळाल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार श्रींजयचा मृत्यू नशेच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. श्रींजयचा मृत्यू गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला की त्याची हत्या झाली, याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT