Crime News Saam Tv
देश विदेश

BJP Crime: धक्कादायक! महिलेवर भाजप नेत्याकडून लैंगिक अत्याचार, पक्षाकडून त्वरित हकालपट्टी; परिसरात खळबळ

Case Registered Against BJP Leader for Molesting Woman: मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेने भाजप नेते सुरेश सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेने भाजप नेत्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजप नेत्याविरोधात बीएनएस कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती मिळताच भाजपने आरोपीला पक्षातून निष्कासित केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सुरेश सिंह असे भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सुरेश यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सुरेश यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निष्कासित केले आहे.

सोमवारी पोलिस उपअधीक्षक गायत्री तिवारी यांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNC) कलम ७४ (महिलेवर विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर), ७५ (लैंगिक छळ) आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासानंतर कारवाई केली जाईल'

डेप्युटी एसपी म्हणाले, या प्रकरणाचा सखोल तपास करून पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, भाजपच्या सिधी जिल्हा युनिटचे सुरेश सिंह यांना रविवारी त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. त्यांच्या "अशोभनीय कृत्याबद्दल" प्रदेश पक्षाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी पक्षातून निष्कासित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT