BJP Saam
देश विदेश

BJP Leader: आधी मांडीवर बसवंल अन् डान्सरला किस; ७० वर्षीय भाजप नेत्याने भर लग्नात डान्सरसोबत नेमकं काय केलं?

Obscene Video of BJP Leader: भाजप नेते आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंग रघुवंशी एका अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बब्बन सिंग रघुवंशी यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या मांडीवर एक डान्सर बसली आहे. तसेच तिच्यासोबत ते आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच रघुवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, हा व्हिडिओ म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओ हा बिहारमधील एका लग्नाच्या मिरवणुकीतील असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओबद्दल रघुवंशी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 'बिहारमधील लग्नाच्या मिरवणुकीत मी उपस्थित होतो. स्टेजवरील डान्सर स्वतःहून माझ्याजवळ आली आणि काही वेळ बसली. मी तिला कोणताही आग्रह केलेला नाही. व्हिडिओ एडिट करून बनवण्यात आला आहे. आजच्या युगात काहीही शक्य आहे.' असं ते म्हणाले.

'मी पक्षाचा जुना आणि निष्ठावान कार्यकर्ता आहे. माझे वय ७० वर्षे आहे. माझं नाव खराब करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. परिवहन मंत्री दया शंकर सिंह हे माझे नातेवाईक आहेत, आणि त्यामुळेच विरोधकांच्या निशाण्यावर मी आहे. व्हिडिओ व्हायरल करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी व्हायरल व्हिडिओवर दिली.

पोलीस कारवाईची मागणी

रघुवंशी या व्हिडिओ संदर्भात पोलिसांची मदत घेणार आहेत. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. रघुवंशी यांनी ही व्हिडिओ एडिडेट असून, या व्हिडिओमागे कुणाचा हात आहे, हे शोधून काढणार असल्याचं सांगितलं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर बब्बन सिंग यांच्याबाबत जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT