Former BJP MLA N L Narendra Babu joins Congress in Karnataka Saam tv
देश विदेश

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

Former BJP MLA Joins Congress Party : कर्नाटकात भाजपचे माजी आमदार एन. एल. नरेंद्र बाबू यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी आदल्या दिवशीच भाजपचा राजीनामा दिला होता आणि पक्षाच्या राज्य ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदावरूनही पायउतार झाले होते.

Bharat Jadhav

  • कर्नाटकातील भाजपचे माजी आमदार एन. एल. नरेंद्र बाबू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.

  • नरेंद्र बाबू यांनी कर्नाटक भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.

राजकारणात धक्कातंत्र अवलंबून विरोधकांना चेकमेट करणाऱ्या भाजपला आता काँग्रेसकडून मोठे धक्के बसत आहेत. बडे-बडे नेते काँग्रेस वाट धरू लागलेत. चंडीगडनंतर रविवारी कर्नाटकच्या राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळाला. येथील भाजपचे माजी आमदार एन. एल. नरेंद्र बाबू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्याचे काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.

नरेंद्र बाबू यांनी आदल्या दिवशीच म्हणजेच शनिवारी, भाजपचा राजीनामा दिला होता. त्यासोबतच त्यांनी पक्षाच्या कर्नाटक ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. आपण काँग्रेसमध्ये परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. राज्यातील काही नेते भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच ही राजकीय घडामोड घडलीय.

इतरही नेतेही रांगेत आहेत: शिवकुमार

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, केवळ नरेंद्र बाबूच नव्हे, तर भाजपचे इतरही अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यात केंद्रीय स्तरावरील नेत्यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, काँग्रेसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी पक्षाने जिल्हास्तरावरील काँग्रेस नेत्यांवर सोपवली आहे. ज्यांचा कॉंग्रेसच्या विचारसरणीवर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर विश्वास आहे त्यांना एकत्र घेऊन संधी दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

शिवकुमार यांनी हा राजकीय बदल केवळ नेत्यांपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी तरुण पिढीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, देश खूप महत्त्वाचा आहे आणि तरुण पिढी आता कॉंग्रेसकडे पाहत आहे. त्यांच्या मते, गेल्या 13 वर्षांपासून भाजपाला संधी दिली जात होती. आता तरुणांना कॉंग्रेसकडून आशा आहे.

नरेंद्र बाबू यांनी भाजप का सोडला?

नरेंद्र बाबू हे यापूर्वी भाजपच्या कर्नाटक ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष होते. शनिवारी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जे कार्यकर्ते पक्षासाठी कठोर परिश्रम करतात त्यांना योग्य ओळख आणि पद मिळत नाही. दरम्यान नरेंद्र बाबू यांनी यापूर्वीच भाजप सोडण्याचे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. ते 13 सप्टेंबर रोजी शिवकुमार आणि बीके हरिप्रसाद यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आधीच होती. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र बाबू म्हणाले की ते आता काँग्रेससोबत काम करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना मोठा धक्का, 20 वर्षे जुन्या प्रकरणात गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आर्यवीर सेहवागकडे संघाची धुरा; DDCAने पहिल्यांदा सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT