Senior Uttar Pradesh BJP leader and former MLC Hira Thakur has joined Congress, saam tv
देश विदेश

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Hira Thakur Join Congress: उत्तर प्रदेश भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य हिरा ठाकुर यांनी भाजपला रामराम ठोकलाय. हिरा ठाकूर यांनी तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर मागासवर्गीयांशी अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी MLC हिरा ठाकुर काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत

  • जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर मागासवर्गीयांशी अन्याय झाल्याचा आरोप

  • २०२७च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकुरांचा काँग्रेस प्रवेश महत्त्वाचा

लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू होत. आता मात्र अंतर्गत वादामुळे पक्षातून आऊटगोइंग सुरू झालीय. इंडिया आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा ओढा भाजप आणि एनडीएमध्ये जाण्याचा होता. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाले. भाजपमधील नेते काँग्रेस पक्षात जाऊ लागले आहेत.उत्तर प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार हिरा ठाकुर यांनी तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यामुळे राजकारणात भाजपचे वारे उटले फिरले की काय अशी चर्चा सुरू झालीय.

उत्तर प्रदेशमध्ये आता लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. जातीआधारीत जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातीसोबत मोठा धोका झाला आहे, त्यामुळे आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी हिरा ठाकुर यांनी पक्षाला रामराम ठोकताना म्हटलंय.

दरम्यान हिरा ठाकुर हे तब्बल बारा वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते. तसेच ते उत्तर प्रदेश राज्याच्या मागास वर्ग आयोगाचे उपाध्यक्ष देखील होते. त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होता. त्यांनी अनेकदा मागास वर्ग आयोच्या विविध समस्यांवर आक्रमक आंदोलनं देखील केली आहेत.

हिरा ठाकुर यांनी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी राजेंद्र पाल गौतम, पक्षाचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद आणि खासदार राकेश राठोड यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद यांनी हिरा ठाकुर यांच पक्षात स्वागत केलं. यावेळी अनिल जयहिंद यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने जातीआधारीत जनगणनेच्या आधारावर अनुसूचित जाती, जमातीसोबत मोठा धोका केलाय, असं यावेळी अनिल जयहिंद म्हणालेत.

दरम्यान हिरा ठाकुर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कर्पूरी ठाकुर यांचं स्मरण करताना म्हटलं की, कर्पूरी ठाकुर हे देशातील असे पहिले नेता होते. त्यांनी बिहारमधील मागासवर्गीय लोकांना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मात्र अजूनही अनेक लोक आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचं देखील स्वागत केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT