Cyclone Biparjoy
Cyclone Biparjoy Saam TV
देश विदेश

Cyclone Biparjoy: घरातून बाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे ६७ रेल्वे रद्द

Ruchika Jadhav

Biparjoy Update News: बिपरजॉय चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला आहे. पुढचे काही दिवस कोकण किनारपट्टीसाठी देखील महत्वाचे असणार आहेत. सध्या चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. १५ जूनपर्यंत बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानला धडकणार आहे. यावेळी १२५ ते १३५ असा ताशी वेग असणार आहे. अशात रेल्वे विभाग देखील बिपरजॉय चक्रीवादळामुळे सतर्क झाले आहे. (Latets Biparjoy Update News)

बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Biparjoy Cyclone) धोक्यामुळे रेल्वे मंत्रालयाने वॉर रुम्स सज्ज केल्या आहेत. गुजरातकडे (Gujrat) जाणाऱ्या वेसटर्न रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. एकून ६७ रेल्वे रद्द करण्यात आल्यात. चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे येत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना चक्रीवादळाचा त्रास होऊनये यासाठी रेल्वे मंत्रालयाने ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळचा प्रवास असलेल्या ट्रेन सुरु आहेत. अशात रेल्वे स्थानकावर देखील योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊनये यासाठी स्थानकावर खाद्यपदार्थांचे जास्तीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये खाद्यपदार्थांचा जास्तीचा साठा ठेवण्यात आला आहे. रेल्वेस्थानकातून येणाऱ्या प्रवाशांना सुखरुप त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी राज्य सरकारकडून जास्तीत्या बस देखील देण्यात आल्या आहेत. यासह जास्तीची काळजी घेत रुग्णवाहिकाही तैणात करण्यात आल्या आहेत.

सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी

गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना देखील हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातमधील (Gujarat) जखाऊ पोर्ट ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान खात्याने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १५ जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lychee Side Effects: मधुमेह असणाऱ्यांनी लिची का खाऊ नये?

Face Serum at Home : घरच्याघरी बनवा इफेक्टीव Face Serum; कमी खर्चात येईल सेलिब्रीटी सारखा ग्लो

Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

Gaza Airstrikes Israeli: गाझामध्ये इस्रायलचा एअर स्ट्राइक; लहान मुले, महिलांसह २० जण मृत्युमुखी, भयंकर दृश्ये

Mumbai Lok Sabha: पवईत मतदानाचा घोळ; ईव्हीएम मशिन बंद, आदेश बांदेकर भडकले

SCROLL FOR NEXT