Crime News Saam Tv
देश विदेश

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Gunmen Shoot Primary School Teacher: बिहारच्या छपरा येथे शालेय शिक्षक सनोज कुमार यांची गोळ्या झाडून हत्या. मोटारसायकलवरून हल्लेखोर आले होते. पोलीस तपास सुरू.

Bhagyashree Kamble

बिहारच्या छपरा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी शाळेतून घरी परतणाऱ्या एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पहेलिज पोलीस स्टेशन हद्दीतील खारिका बाजारातील देवी स्थानकाजवळ घडली. ही हत्या वादातून झाल्याचे म्हटले जात आहे. शाळेतून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी मागून त्याच्या डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक जुने काडतूस जप्त केले.

सनोज कुमार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनोज कुमार हे प्राथमिक शाळेतील शिक्षक होते. त्यांची पत्नीही शाळेत शिक्षिका आहे. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर सनोज त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी त्यांच्या मागून मोटारसायकलवरून दोन हल्लेखोर आले.

हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. तसेच तेथून पळ काढला. या हल्ल्यात शिक्षक सनोज कुमार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रूग्णालयात रेफर केले. तिथे डॉक्टरांनी सनोज कुमार यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पहलेजा पोलीस ठाण्याचे अनुराधा कुमारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सनोज कुमार यांच्या मृत्यूनंतर पालक, पत्नी, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर दुखा: चा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीसाठी पुण्यातील दोन मुक्कामाचा पालखी मार्ग बदलणार?

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे २४ तास! लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम अन्यथा ₹४५०० रुपये विसरा

Badishep Kesar Water Benefits: उन्हाळ्यात बडीशेप केसरचे पाणी नक्की प्या, मिळतीले 'हे' फायदे

भोंदू अशोक खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? १०० कोटींच्या हवाला प्रकरणाने खळबळ

Kairicha Methamba Recipe : फक्त १० मिनिटांत तयार आंबट-गोड रसरशीत कैरीचा मेथांबा, पाहताच तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT