Bihar Legislative Council Chairman Awadhesh Narayan Singh resigns, with JD(U)’s Ramvachan Rai reportedly in focus for the post. saam tv
देश विदेश

Bihar Politics: विधान परिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा; कोणत्या पक्षाकडे जाणार पद अन् कोण होणार नवे सभापती?

Bihar Politics : अवधेश नारायण सिंह यांनी भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेचे सभापतीपद भूषवले होते.आता पुढील सभापती जेडीयूच्या कोट्यातून निवडले जातील आणि सध्या या शर्यतीत केवळ एकाच नावाचा विचार होत आहे.

Bharat Jadhav

  • बिहार विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी राजीनामा दिला

  • अवधेश नारायण सिंह हे भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत.

  • जेडीयूकडून रामवचन राय यांचे नाव पुढील सभापतीपदासाठी चर्चेत आहे.

बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी सोमवारी (२८ सप्टेंबर २०२६ रोजी आपला राजीनामा दिला. ते भाजपच्या कोट्यातून सभापतीपदावर विराजमान झाले होते. अवधेश सिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता हे पद जेडी(यू)कडे गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेचे पुढील अध्यक्ष जेडी(यू)च्या कोट्यातील असतील.

अवधेश नारायण सिंह यांच्या राजीनाम्यानंतर, जेडी(यू)मधून पुढील सभापती कोण होणार, हा चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे. कोणाच्या नावाची चर्चा होत आहे? अहवालांनुसार, जेडी(यू)चे एमएलसी आणि विधान परिषदेचे उपसभापती रामबच्चन राय यांची पुढील सभापती म्हणून नियुक्ती होऊ शकते.

राजीमाना पत्रात काय म्हणाले अवधेश सिंह?

अवधेश नारायण सिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय की, आज मी बिहार विधान परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या रुपात मी माझ्या राजकीय करिअर सुरू केलं होतं. पक्ष संघटनेतील अनेक पदावर काम करताना मी संघटनेच्या विस्तारासाठी नेहमी सक्रीय होतो. एनडीएच्या सरकारमधील सर्व नेत्याचे मी आभार मानतो.

या पत्रात सिंह यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेही आभार मानलेत. एनडीएच्या सरकारमध्ये मला चारवेळा विधान परिषदेचं अध्यक्ष बनवण्याची संधी मिळाली. ही परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संभाळताना मला नितीश कुमार यांचे खूप सहकार्य लाभले. यासह अवधेश नारायण सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचेही आभार मानलेत.

अवधेश नारायण यांनी सांगितले की, ३३ वर्षे विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांनी पुढे नमूद केले की, सदस्य म्हणून ते सभागृहात आपली सक्रिय भूमिका बजावत राहतील. शेवटी ते म्हणाले, "सभागृहाचे सभापती असताना मला मिळालेले प्रेम आणि सहकार्य याबद्दल मी सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करदात्यांसाठी सर्वात मोठी बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; पाहा नवी अंतिम तारीख

Google Search: गुगलवर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करू नका, महागात पडेल

Bank Employees Overtime : रविवारी काम करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना किती ओव्हरटाइम मिळणार? जाणून घ्या नेमका हिशोब

Maharashtra News Live Update: लाडक्या बहीण योजना बाजूला करणार नाही, त्यासाठी वेगळा निधी: बावनकुळे

Maharashtra : महाराष्ट्रातील ऋषिकेश म्हणून प्रसिद्ध आहे 'हे' ठिकाण, पाण्याच्या लाटांवर अनुभवाल थरार

SCROLL FOR NEXT