stampede At Baba Siddhnath Temple Saam Tv
देश विदेश

Bihar News : श्रावण सोमवारी मोठी दुर्घटना, सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; ७ भाविकांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Several dead in stampede At Baba Siddhnath Temple in Jehanabad : बिहारमध्ये बाबा सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झालीय. यामध्ये आतापर्यंत सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सातजण ठार तर नऊजण जखमी झाले आहेत. जहानाबादच्या डीएम अलंकृता पांडे यांनी सांगितलं की, आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. जिल्हा प्रशासनही उपस्थित होते.

बाबा सिद्धनाथ मंदिरातील घटना

जहानाबादचे एसडीओ विकास कुमार म्हणाले की, ही एक दुःखद घटना आहे. सर्व व्यवस्था कडेकोट होती, आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. जहानाबादच्या जिल्हा दंडाधिकारी अलंकृता पांडे यांनी आज सकाळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलंय. श्रावणी सोमवारनिम्मित मंदिरात जलाभिषेक घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त सिद्धनाथ मंदिरात शिवभक्तांनी गर्दी केली होती. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झालाय. तर मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जहानाबादजवळील बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिर परिसरामध्ये ही घटना घडली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. सुरक्षा दल आणि यात्रेच्या परिसरात तैनात स्वयंसेवकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य केलं जातंय.

या घटनेतील जखमींना जहानाबाद हॉस्पिटल आणि मखदुमपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय. त्यापैकी सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथक तत्परतेने काम करत आहे. पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मंदिर परिसरात पोहोचले आहेत. तेथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वीची घटना

याआधी तिसऱ्या वैशालीच्या हाजीपूरमध्ये विद्युत प्रवाह लागून ९ भाविक जिवंत जळाल्याची दुर्घटना घडली होती. गंगाजल गोळा करण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांच्या ग्रुपचा डीजेच्या टेन्शन वायरच्या प्रभावाखाली आला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं होतं. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची तत्काळ भरपाई देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT